Skip to main content

भेटीतला बंदा रुपया

शुभप्रसंगी भेट देणे ही प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. पूर्वी ती धातू स्वरूपात असे.. जसे की तांब्या-पितळेची भांडी, चांदीच्या वस्तू (उदाहरणार्थ पेला, वाटी, लामण दिवा,छल्ला, चौफुला, हळद कुंकवाचा करंडा, अत्तरदाणी, गुलाबदाणी), तर सोन्यामध्ये (कर्णफुले, हार, चेन, ब्रेसलेट, अंगठी, कडे इत्यादी).. दिवस पुढे जात होते व भेट स्वरूप पण बदलले.. मग आले स्टीलचे डिनर सेट, चांदी-सोन्याची नाणी.. आता चांदी-सोन्याचा दर पाहता हे लुप्त पावत आहे.. आधीच असलेल्या व वापरात नसलेल्या स्टील, क्रोकरीच्या वस्तू या भेट स्वरूपात आलेल्या असूनही वापरल्या जात नाहीत.. उलट त्याचे काय करायचे असा प्रश्न निर्माण होतो.

अशावेळी छोट्या व टोकन स्वरूपात भेट म्हणून पाकिटात रोख रक्कम भरून दिली जाते. ती शंभर रुपये, पाचशे रुपये, हजार रुपये अशी नसते तर ती एकशे एक रुपये, पाचशे एक रुपये, एक हजार एक रुपये अशा स्वरूपात असते..आपण कधी याचा विचार केला आहे का, की हा एक रुपया अधिक स्वरूपात भेटीत का समाविष्ट केला जातो...... या मागचा विचार असा आहे..


 शून्य हे अंत म्हणजेच शेवट दर्शवते. तर एक अंक 'नवीन सुरुवात' याचे द्योतक आहे. कदाचित भेट प्राप्तकर्त्याला नवीन सुरुवात फलदायी ठरो ही शुभप्रसंगी दिलेल्या भेटीमागील भावना असावी.

 १00, ५00, १000 सारख्या संख्या विभाजित होतात.

 परंतु १0१, ५0१, १00१ या अविभाज्य राहतात. थोडक्यात आपली भेट स्वरूप रोख ही अविभाज्य रहावी,  अखंड राहावी, असाही उद्देश असू शकतो. 

 भेटी सोबतच्या भावना व आशीर्वाद या कायमस्वरूपी अखंड अविभाजित राहाव्या अशी संकल्पना १0१, ५0१, १00१ अशी रोख भेट देताना मनी असावी. 

हाच विचार ज्यावेळी एखादा सार्वजनिक कार्यक्रम असतो व वर्गणी गोळा केली जाते तेव्हाही वापरला जातो. तसेच एखादा धार्मिक विधी करणे असल्यास, त्यावेळी दक्षिणा व खर्च या स्वरूपात १0१, ५0१, १00१ इत्यादी रक्कम ग्राह्य धरण्याची पद्धत आहे.

 'एक रुपया हा वर्धित्वाकडे मार्ग दाखवतो,शून्य नाही'

माझी अशी धारणा आहे की हा एक रुपया नाणे स्वरूपातच असावा.. कारण एकतर एक रुपयाची नोट मिळणे दुरापास्त आणि एक रुपयाचे नाणे सहज उपलब्ध. नाणे हे धातूपासून बनलेले असते.. थोडक्यात नाण्याचा संबंध खनिजाशी म्हणजेच निसर्गाशी येतो. नैसर्गिक संपत्ती लक्ष्मी देवीचे प्रतीक मानले जाते.. आपली भेटस्वरूप रोखरक्कम शुभाशीर्वाद स्वरूपात अखंड व निसर्गाशी तादात्म्य राखून लक्ष्मीप्रसाद म्हणून ज्याला दिले जाते, त्याच्या भरभराटीस प्रेरक ठरतात असा समाज.

 मोठी रक्कम, (१000+) ही इन्व्हेस्टमेंट म्हणून गणली जाईल तर एक रुपया त्या इन्व्हेस्टमेंटचे बीजस्वरूप असेल. 

 भेट ही शुभेच्छा, आशीर्वाद या स्वरूपात असल्याकारणाने त्यामागे  ज्याला ही भेट दिली जाते त्याचा सदैव उत्कर्ष व्हावा ही भावना मनोमनी असते.


 या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता| नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नमः॥

Comments

  1. खूप सुंदर 👌🏼

    ReplyDelete
  2. दत्तात्रय फणसे छान महत्व पूर्ण माहिती 👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रथम वंदन

नमस्कार मंडळी.  माझ्या "श्रीगणेश पूजा विधि" या गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या पुस्तकाला गणेश भक्तांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. यामुळे मला मिळालेली उमेद असे सांगत होती की आपल्या हिंदू धर्मात अशा अनेक प्रथा आहेत आणि अशी माहिती आहे जी आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. ती जतन करणे आवश्यक आहे जसे की आजीबाईचा बटवा इत्यादी. याच्या अनुषंगाने मी विविध विषयांना आजपासून स्पर्श करण्याचा आणि ते विषय आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. अपेक्षा ही आहे की माझा हा संकल्प आपल्या पसंतीस उतरेल. कुठल्याही कामाची सुरुवात करताना गणेशाला वंदन करूनच आपण करतो.  ॐ गं गणपतये नमः | अष्टविनायकांची नावे याप्रमाणे:  मोरगावचा मयुरेश्वर  सिद्धटेकीचा सिद्धिविनायक  पालीचा बल्लाळेश्वर  मढचा वरदविनायक  थेऊरचा चिंतामणी  लेण्याद्रीचा गिरिजात्मक  ओझरचा विघ्नेश्वर  आणि आठवा रांजणगावचा महागणपती वाचकहो, ही सुरुवात आहे. दर आठवड्यातून एकदा मी आपल्या भेटीस येईन. प्रत्येक वेळी विषय वेगळा असेल, अशी माझी अशी माझी संकल्पना आहे. - आनंद कृष्णाजी कणेक...

अधिक मास व सहस्त्रचंद्रदर्शन

नुकताच अधिक मास समाप्त झाला. काहीजण त्याला मलमास, धोंडा मास, किंवा पुरुषोत्तम मास असेही संबोधतात. हा अधिक मास कसा झाला हे समजावून घेऊ. प्रत्येक महिन्यासाठी एक विशेष देवता आहे. अधिक मासाला मात्र देवता नव्हती. तरीही हा मास श्रेष्ठ मानला जातो तो कसा?  थोडे त्याच्या निर्मिती विषयी. श्री महर्षी व्यास सांगतात, एका वर्षातील बारा महिने म्हणजे एक चांद्र वर्ष होते त्याचा कालावधी अंदाजे ३५४   दिवसांचा. तर एका वर्षातील सूर्याचे बारा राशीतून संक्रमण म्हणजे एक सौर वर्ष. त्याचा कालावधी अंदाजे ३६५  दिवसांचा. त्यामुळे चंद्र वर्ष व सौर्य वर्ष यात दहा-अकरा दिवसांचा फरक पडतो. कालगणनेचा ताळमेळ बसण्यासाठी या दोघांचा मेळ बसवणे क्रमप्राप्त झाले. साधारण दर अडीच वर्षात ह्यामुळे तीस दिवसाचा फरक पडला, म्हणून चांद्र वर्षात एक अधिक मास घेऊन हे सांगड घातली गेली. आता हा महिना कसा ठरवावा? तर ज्या महिन्यात सूर्याचे राशी संक्रमण होत नाही, तो हा महिना धरला गेला. त्यामुळे त्या चांद्र वर्षात बारा ऐवजी तेरा महिने झाले. हा तेरावा महिना म्हणजेच अधिक मास. अधिक महिन्यात ठराविक ऋतू, सणवार, संक्रांत येत नव्हते. लग्न...

पत्ते आणि बोध

आज आपण मनोरंजनाचे साधन व धर्म यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी मी पत्त्याचा कॅट हे साधन वापरणार आहे.  कॅट मध्ये ५२ पत्ते असतात व एक किंवा दोन जोकर असतात. म्हणजेच कमाल पत्ते ५४, रंग दोन - ' लाल व काळा ' व प्रकार ४ - ' इस्पिक , बदाम , किलवर , चौकट '. दोन रंग म्हणजे ' दिवस आणि रात्र '. चार प्रकार म्हणजे चार आश्रम - ब्रह्मचर्य , गृहस्थाश्रम , वानप्रस्थाश्रम , व संन्याशाश्रम . अथवा चार उपाय  - साम , दाम , दंड , भेद अथवा चार वेद  - ऋग्वेद , यजुर्वेद , सामवेद , व अथर्ववेद . एका चांद्रवर्षात ५२ आठवडे येतात हे ५२ आठवडे म्हणजे आपले  ५२ पत्ते. प्रत्येक प्रकारात १३ पत्ते म्हणजे ४×१३ = ५२  आठवडे झाले.  या ५२ पत्त्यांची म्हणजेच एक्का ते राजा यांची बेरीज ३६४ होते त्यात जोकर धरला की झाले ३६५ म्हणजे एक चांद्रवर्ष. दुसरा जोकर समाविष्ट केला तर बेरीज होते ३६६  म्हणजेच ' लीप वर्ष '. ५२ पत्त्यात बारा चित्रपत्ते असतात.. गुलाम , राणी , राजा म्हणजेच ४×३ = १२ यांना आपण बारा महिने संबोधूया.   आता पत्त्यांचा अर्थ लावूया    दुर्री - दोन ग्रह...