अनपेक्षित दर्शन
मी शक्यतो चालत जाते. तशी सवय आहे माझी. जर अंतर खूप जास्त असेल तरच मी रिक्षा करते. असच झाले त्या दिवशी. मी market मध्ये गेले होते. साधारण अंतर 1.5 किलोमीटर. सामान घेऊन झाले तशी चालत निघाले. नेहमी जाते त्या ऐवजी दुसरा रस्ता घेतला. रस्ता तसा ओळखीचा, पायाखालचा. माझ्या जलद चालेने चालत होते. इथे तिथे रस्त्यावर बघत. अचानक माझी नजर एका देवळावर पडली. श्री स्वामी समर्थ मंदिर होते ते. अगदी छोटे सुबक देऊळ होते. देवळापुढे 4-5 माणसे हात जोडून उभी होती. श्रद्धाळू, मी विचार केला दर्शन घ्यावे. मी चालत त्या देवळाजवळ पोचले. तिथे जाता कळले आरती चालू आहे. नव्हे आरतीची सांगता होत आहे. मंत्रापुष्पाजली म्हटली जात होती. मी चप्पल काढून हात जोडून तिथेच थांबले. इतक्यात पूजा करणारे गुरुजी बाहेर आले. माझ्या कडे बघून म्हणाले, "जा बाळा आत जाऊन दर्शन घे." मी त्या वयस्कर गुरुजींची आज्ञा लगेच पाळली. देवळात जाऊन स्वामींचे दर्शन घेतले. बाहेर येताच गुरुजी म्हणाले, "प्रसाद घेतल्याशिवाय जायचे नाही बरं." माझ्या हातावर त्यांनी बुंदीचा लाडू ठेवला. मी प्रसाद घेऊन मी लगेचच निघाले. हे सगळंच खूप अ...