Posts

Showing posts with the label marathi

आतुरता आगमनाची

Image
माझा जन्म मुंबईचा. मुंबई... धाकाधाकीचे जीवन म्हणजे मुंबई. लोकल ट्रेनसाठी प्रत्येक सेकंदाची किंमत माहित असलेली मुंबई. घड्याळा पेक्षा जलद गतीने पाळणारी मुंबई. अशा मुंबईचा परमपूज्य आणि परमप्रिय उत्सव म्हणजे गणेशोत्सव. मग तो कौटुंबिक असो वा सार्वजनिक. महत्व तेवढेच आणि उत्साहही तेवढाच. वातावरण बदलून जाते गणेशउत्सव आला की. रस्ते सजावटीचे साहित्य, फुले, हरी, यांनी भरून जातात. कपड्यांची दुकानें आणि मिठाईची दुकाने इथे मुंगीला पण जागा मिळत नाही. पण सगळ्यांचे चेहरे आनंदी, कारण सगळ्यांना आतुरता बाप्पाच्या आगमनाची. नवीन वर्ष सुरु झाले, नवे calendar आले की आधी बघायचे गणेशउत्सव कधी आहे. लहानपणी जेव्हा शाळा सुरु व्हायाच्या तेव्हा पहिले आम्ही बघायचो की गणेशउत्सवा साठी किती दिवस सुट्टी आहे. आजही तेच, ऑफिस मध्ये calendar बघतो यांचसाठी की गणेशउत्सव केव्हा आहे.  काळ बदलला वेळ बदलली, पण बाप्पाच्या आगमनाची आतुरता तेवढीच आहे 🙏🏻

अखेरचा दंडवत

Image
गेल्या आठवड्यात मी मालाडला गेले. आमच्या जुन्या सोसायटी मध्ये पेठेनगरला. तो होता अखेरचा दंडवत. माझा जन्म मालाड, मुंबई इथला. माझा जन्म आमच्या सोसायटी जवळच्या हॉस्पिटल मध्ये झाला आणि मी मोठी झाले पेठेनगरमध्ये. 2017 मध्ये आम्ही पेठेनगर सोडले.  माझी सोसायटी मध्ये फारशी कोणाशी मैत्री नव्हती पण अनेक आठवणी होत्या.  सोसायटीची बाग आणि तिथली फुलझाडे,. Playground आणि तिथले अगणित खेळ. गच्ची आणि गच्चीतल्या गप्पा. गणपतीचे मंदीर आणि त्याच्या समोर केलेले अथर्वशीर्षाचे सहस्तरावर्तन. सगळ्याचे स्मरण झाले.  आता ते काहीच नव्हते. बागेची दुर्दशा पाहवत नव्हती. ना फुल ना झाड. Playground नव्हे तर landfill. गच्चीने अडागळीच्या जागेचे रूप घेतले होते. जुने, खराब, किंवा मोडकळीस आलेले furniture विखूरले होते. जुने कपडे, तुटलेल्या कुंड्या पडल्या होत्या. जमेची बाजू केवळ गजाननाचे मंदीर ते अजूनही टूमदार.  ह्या सगळ्याचे कारण एकच. Redevelopment of the society. रहिवास्यांच्या भल्याचीच गोष्ट आहे. अनंत वर्षे थकलेला प्रकल्प आता आकार घेत आहे. बरेच जण सोडून गेले होते आणि बाकीचे जागा रिकाम...

फेरारीची सवारी

Image
फेरारी नाव घेताच डोळ्यासमोर एक luxury sports car येते. अशी कार जी आपल्या कुवती बाहेरची आहे. जी स्वप्नात सुद्धा आपल्याला परवडत नाही.  माझा भाचा Formula 1 चा प्रेमी एकदा मला racing बद्दल सांगत होता. तेव्हा आमच्याकडे मावशी काम करत होत्या. माझा भाचा मला काही फेरारी विषयी सांगत होता. त्याला मी म्हणाले "तुला फेरारी चा इतिहास माहित आहे का?" तो नाही म्हणता मी सांगितले की फेरारी परिवार गरीब शेतकरी होते. ट्रॅक्टर घ्यायला पैसे नसताना त्यांनी घरी कमी खर्चात ट्रॅक्टर केले (DIY). नंतर त्यांनी स्पोर्ट्स कार आणि luxury कार चा business सुरु केला. हे ऐकता मावशी म्हणतात, "बाबू मी पण शेतकरी आहे." तसें मी लगेच म्हटले, "बघ त्या पण luxury car चा business सुरु करतील." मग मावशी म्हणतात, "मी पण ट्रॅक्टर तयार करणार. मोठ्या छान गाड्या तयार करणार." मी म्हणाले, "नक्कीच. मग आपल्या मावशी celebrity होणार." ह्या पुढे त्या जे बोलल्या त्याने मी डोक्याला हातच लावला. मावशी बोलल्या, "मग मी छान गाडीतून तुझ्याकडे भांडी घासायला येणार." मी मनात म्हणाले ज्या...

रांगोळी आणि मी

Image
रांगोळीचे आणि माझे नाते खूप जुने आहे.  बालपणापासूनच मला कलेची खूप ओढ होती. कधी चित्र काढावे तर कधी चित्र रंगावावे. कधी कलात्मक मांडणी करावी. कधी काही लिहावे. दरवर्षी जशी दिवाळी यावी तसं माझं मन धावायचं रांगोळी कडे.  आधी आई रांगोळी काढत असे. मी आईच्या बाजूला बसून रांगोळी कशी काढतात ते पाहत बसे. एखादा रंग भरायला दे असा आग्रह करत असे. शेवटी माझ्या बडबडीला कंटाळून आई एखादा रंग भरायला देत असे. तो रंग भरून मी पण खुश होत असे. तेव्हा मी ठरवले की मोठी झाल्यावर मी मोठ्या मोठया रांगोळ्या काढीन. थोडी मोठी (तिसरी चौथी मध्ये घेल्यावर) झाल्यावर मी रांगोळी काढण्याची कामगिरी स्वतः हाती घेतली. चार ठिपक्या पासुन रांगोळी काढायला सुरु केले. पण मजल फक्त 17 ठिपक्यांच्या रांगोळी पर्यंतच जाऊ शकली. मुंबईच्या flat बाहेर कितीशी जागा मिळणार, पण त्यातही माझे समाधान व्हायचे. दिवाळीचे सारे दिवस आमच्या दारापुढे रोज नवी रांगोळी असायची. शिक्षण पूर्ण करून जेव्हा नोकरी सुरु झाली, तेव्हा मी घरी उशिरा यायचे. कितीही उशीर झाला तरी मी न चुकता रांगोळी काढायचे. एकदा रात्री 9 वाजता मी रांगोळी काढायला सुरुवात केली होती. द...

दिवाळी आणि बरंच काही

Image
तो दिवस उजाडला. आजच तो दिवस. आज सगळे भेटणार. दिवाळीच्या एका आठवड्या नंतर का होईना पण भाऊबीजसाठी सगळे येणार.  खरंच आधी लहानपणी किती वेळा भेट होत असे. आता सगळे स्वतःच्या routine मध्ये गर्क असतात. पण त्याला ही कारण आहे. लहानपणी कुठे ऑफिस होते. लहानपणी कुठे client meetings होत्या. लहानपणी मस्त दिवाळीची सुट्टी (आणि नकोसा दिवाळीचा अभ्यास).  एरवी खूप कंटाळा करणारे सुद्धा अगदी वेळेवर उठले. Weekend असतानाही लवकर आंघोळी केल्या. इस्त्री नीट घडी असलेले नवीन कपडे घातले. मग वाट बघतली, कोण कधी येतंय. Whatsapp वर विचारायचं का कुठे पोचले की फोन करायचा? पण गाडी चालवत असताना कसे रिप्लाय करेल. ट्रॅफिक लागला असेल कदाचित. जाऊदे येतील सगळे वेळेवर. डोक्यात शंभर विचार.  ताटे काढली का? एवढी बस होतील कि अजून लागतील? चमचे थोडे जास्त घेऊ. चमचे कितीही असले तरी कमीच पडतात. आणि पेल्यांच काय? Disposable cups घेऊ तेवढाच जरा व्याप कमी. दोन चार सर्विन्ग बाउल्स आणि दोन चार मोठे चमचे वाढायला. पाणी लागेल तेव्हाच भरून घेऊ. बाकी सगळी तयारी झाली. एका मागोमाग एक सगळे आहे. घर उत्स्फूल्लीत झालं. गप्पा आणि हास्याची म...