आकाशकंदील, मी, आणि पाऊस

दिवाळीच्या खरेदीमध्ये एक महात्वाची वस्तू म्हणजे आकाशकंदील. त्याच्याशिवाय दिवाळी अपूर्णच.

दरवर्षी कंदील आणायचा, "हा कंदील आपण पुढच्या वर्षीसुद्धा वापरू" असे ठरवायचे, आणि पुढच्या वर्षी "रंग उन्हात विटला" असे म्हणून नवीन कंदील आणायचा. त्यात नवीन ते काय! सालाबाद प्रमाणे ही परंपरा पार पाडत ह्या वर्षी आम्ही कंदील खरेदीसाठी गेलो. बरं यंदा कुठल्या प्रकारचा कंदील घ्यायचा हा निर्णय आमचा आधीच झाला होता. गेल्या वर्षी आम्ही एका घरी पिवळा, अगदी हळदीच्या रंगाचा पिवळा कंदील पहिला होता. त्या कांदिलातून प्रकाश खूप छान दिसत होता. बस्स, तेव्हाच ठरवले की पुढल्या वर्षी असाच कंदील घ्यायचा.

बाकी कंदील पारंपरिक, स्वदेशी (Make in India चा सिंह असेल तर उत्तमच, पण Made in China, Bangladesh, Pakistan असा कुठला nako), पिवळ्या रंगाचा, आणि स्वस्त्यातला, ह्या किरकोळ अपेक्षा. बरीच दुकाने पालथी घातली, पण पाहिजे तसा कंदील काही मिळेना. कुठे प्लास्टिकचे कंदील तर कुठे geletin पेपरचे. कुणी म्हणे चार दिवसांनी या (ह्या पट्ठ्याला कोण सांगणार चार दिवसांनी तर दिवाळी आहे). 

मी म्हटले जाऊ दे, आपण कंदील घरी करू. ज्या दुकानात कंदील आवडला नाही म्हणून दुकान मालकाला सगळे कंदील काढायला लावले त्यालाच म्हणाले card paper, crape paper आणि फेविकॉल द्या. चारशे रुपये देणारे गिऱ्हाईक पन्नास रुपयाचे सामान घेऊन जाणार म्हणून त्या दुकानदाराने रागातच सामान दाखवले. मी  पण "Customer is king" ह्या म्हणीप्रमाणे राजाज्ञा देत सगळ्या brands चे सगळे ऐवज पहिले आणि हवा तो रंग निवडला. "जांभळा पाहिजे तर हा कंदील घ्या. कशाला मेहनत घेता", एक शेवटचा प्रयत्न दुकानदाराचा.  "नको, त्या कंदीलाने खूप धूळ खाल्ली आहे."  असे म्हणत मी सामान घेतले आणि घरी आले. 

मला कंदील करणे काही फार कठीण नव्हते, मी खूप वर्ष घरी कंदील केले आहेत. एका तासात माझा कंदील तयार झाला, त्याचा गोंद रात्रभर सुकू दिला आणि दुसऱ्या दिवशी त्याला उच्चस्थानी बसवले. माझ्या कर्तबगारीचे मी स्वतः भरपूर कौतुक केले. Social media वर फोटो आणि रील्स टाकून जगभर दिंडी पिटली.

दोन दिवस कंदील छान वाऱ्यावर झोके घेत होता. मग उजाडला तो दिवस. पाऊसाची शक्यता हवामानखात्याने दिली आणि पर्जन्याने हजेरी लावली पवन साहेबाना घेऊन. एक तास वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. त्यात कंदीलला थोडी फार दुखापत झाली. रंग थोडा विटला. शेपट्या ज्या सरळ होत्या, त्यांनी trendy curls परिधान केले. सरळ बांधा arthritis झाल्यासारखा वाकला.

झाले ते वाईट झाले, पण दुसऱ्यांच्या घरात पहिले तर काय? जी स्थिती माझ्या घरगुती कंदीलची तीच त्यांच्या महागाड्या विकतच्या कंदीलाची. मग काय, ठेवला तसाच कंदील. मेहनतीचे फळ वाया कसे जाऊ देणार. मग मनाशी निश्चय केला. पुढल्या वर्षी कापडी कंदील करायचा. पण त्यासाठी आतापासूनचा youtube video बघावे लागतील. 

चला तर मग, सुरु करायचे का?

Comments

Popular posts from this blog

Monochromatic style

The craze of social media

Not a friendly face