आतुरता आगमनाची

माझा जन्म मुंबईचा. मुंबई... धाकाधाकीचे जीवन म्हणजे मुंबई. लोकल ट्रेनसाठी प्रत्येक सेकंदाची किंमत माहित असलेली मुंबई. घड्याळा पेक्षा जलद गतीने पाळणारी मुंबई.



अशा मुंबईचा परमपूज्य आणि परमप्रिय उत्सव म्हणजे गणेशोत्सव. मग तो कौटुंबिक असो वा सार्वजनिक. महत्व तेवढेच आणि उत्साहही तेवढाच. वातावरण बदलून जाते गणेशउत्सव आला की. रस्ते सजावटीचे साहित्य, फुले, हरी, यांनी भरून जातात. कपड्यांची दुकानें आणि मिठाईची दुकाने इथे मुंगीला पण जागा मिळत नाही. पण सगळ्यांचे चेहरे आनंदी, कारण सगळ्यांना आतुरता बाप्पाच्या आगमनाची.

नवीन वर्ष सुरु झाले, नवे calendar आले की आधी बघायचे गणेशउत्सव कधी आहे. लहानपणी जेव्हा शाळा सुरु व्हायाच्या तेव्हा पहिले आम्ही बघायचो की गणेशउत्सवा साठी किती दिवस सुट्टी आहे. आजही तेच, ऑफिस मध्ये calendar बघतो यांचसाठी की गणेशउत्सव केव्हा आहे. 

काळ बदलला वेळ बदलली, पण बाप्पाच्या आगमनाची आतुरता तेवढीच आहे 🙏🏻

Comments

Popular posts from this blog

Monochromatic style

The craze of social media

Not a friendly face