कबुतर सैनिक




मी स्वतः प्रणिप्रेमी पक्षीप्रेमी आहे. मला लहान असल्यापासून सर्व प्राणी पक्षी फार आवडयचे. मांजर, खार, बेडूक, आणि कबुतर हे खूपच आवडीचे.

जे प्राणी पक्षी मला आवडतात आणि ज्यांची मला भीती वाटते मी त्यांचा अभ्यास करते. कबुतर ह्या पक्ष्यावर माझे खूप वाचन झाले आहे. कबुतर हे गतीचे आणि शांतीचे प्रतीक आहे. कबुतर एकनिष्ठ असतें (एक गुणधर्म जो माणसात कमी होतं चालला आहे). कबुतर नर आणि मादी दोघे मिळून पिल्ले वाढवतात. आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे त्यांच्यामध्ये Lactation सारखी प्रक्रिया सुद्धा होते. कबुतर GPS शिवाय एका जागेपासून दुसरी कडे जाऊ शकतात. कबुतरांनी विश्वायुद्धात सुद्धा महत्वाची कामगिरी बजावली आहे.

ह्यानंतर प्रश्न येतो कबुतरखान्यांचा. एक जागा जिथे कबुतरांना दाणे टाकून खाऊ घातले जाते. कबुतरखान्याजवळ कबुतरांची पिसे, विष्ठा तसेच मरून पडलेली कबुतरे असतात. कबुतरांची पिसे इतर पक्षांपेक्षा जास्त गळतात. त्यांच्या पिसानमधून जास्त धूळ उडते. ह्या काही known facts आहेत.

कबुतर खडतर परिस्थितीत जिवंत राहणारा पक्षी आहे. त्यांना आपण खाऊ घालण्याची निकड नाही. ते स्वतंत्र जगू शकतात. ह्याच कारणामुळे मी कबुतरखाने बंद करण्याच्या निकालाबरोबर सहमत आहे. निसर्गाच्या चक्रात हस्तक्षेप करण्याचा मानवला काहीच अधिकार नाही. 

Comments

Popular posts from this blog

The craze of social media

Food review: Blue bird masala penne pasta

Uncertainty of life