अखेरचा दंडवत
गेल्या आठवड्यात मी मालाडला गेले. आमच्या जुन्या सोसायटी मध्ये पेठेनगरला. तो होता अखेरचा दंडवत.
माझा जन्म मालाड, मुंबई इथला. माझा जन्म आमच्या सोसायटी जवळच्या हॉस्पिटल मध्ये झाला आणि मी मोठी झाले पेठेनगरमध्ये. 2017 मध्ये आम्ही पेठेनगर सोडले.
माझी सोसायटी मध्ये फारशी कोणाशी मैत्री नव्हती पण अनेक आठवणी होत्या. सोसायटीची बाग आणि तिथली फुलझाडे,. Playground आणि तिथले अगणित खेळ. गच्ची आणि गच्चीतल्या गप्पा. गणपतीचे मंदीर आणि त्याच्या समोर केलेले अथर्वशीर्षाचे सहस्तरावर्तन. सगळ्याचे स्मरण झाले.
आता ते काहीच नव्हते. बागेची दुर्दशा पाहवत नव्हती. ना फुल ना झाड. Playground नव्हे तर landfill. गच्चीने अडागळीच्या जागेचे रूप घेतले होते. जुने, खराब, किंवा मोडकळीस आलेले furniture विखूरले होते. जुने कपडे, तुटलेल्या कुंड्या पडल्या होत्या. जमेची बाजू केवळ गजाननाचे मंदीर ते अजूनही टूमदार.
ह्या सगळ्याचे कारण एकच. Redevelopment of the society. रहिवास्यांच्या भल्याचीच गोष्ट आहे. अनंत वर्षे थकलेला प्रकल्प आता आकार घेत आहे. बरेच जण सोडून गेले होते आणि बाकीचे जागा रिकाम्या करण्याच्या तयारीत होते. त्यामुळेच ही अवकळा आली होती.
Demolition होण्याआधी आम्ही एकदा तिथे गेलो. आपल्या जुन्या घराला डोळे भरून पहिले. एकदा ते क्षण परत जगलो आणि केला तो "अखेरचा दंडवत".
Comments
Post a Comment