फेरारीची सवारी
फेरारी नाव घेताच डोळ्यासमोर एक luxury sports car येते. अशी कार जी आपल्या कुवती बाहेरची आहे. जी स्वप्नात सुद्धा आपल्याला परवडत नाही.
माझा भाचा Formula 1 चा प्रेमी एकदा मला racing बद्दल सांगत होता. तेव्हा आमच्याकडे मावशी काम करत होत्या. माझा भाचा मला काही फेरारी विषयी सांगत होता. त्याला मी म्हणाले "तुला फेरारी चा इतिहास माहित आहे का?"
तो नाही म्हणता मी सांगितले की फेरारी परिवार गरीब शेतकरी होते. ट्रॅक्टर घ्यायला पैसे नसताना त्यांनी घरी कमी खर्चात ट्रॅक्टर केले (DIY). नंतर त्यांनी स्पोर्ट्स कार आणि luxury कार चा business सुरु केला.
हे ऐकता मावशी म्हणतात, "बाबू मी पण शेतकरी आहे."
तसें मी लगेच म्हटले, "बघ त्या पण luxury car चा business सुरु करतील."
मग मावशी म्हणतात, "मी पण ट्रॅक्टर तयार करणार. मोठ्या छान गाड्या तयार करणार."
मी म्हणाले, "नक्कीच. मग आपल्या मावशी celebrity होणार."
ह्या पुढे त्या जे बोलल्या त्याने मी डोक्याला हातच लावला. मावशी बोलल्या, "मग मी छान गाडीतून तुझ्याकडे भांडी घासायला येणार."
मी मनात म्हणाले ज्यांना द्यायला जावी फेरारीची सवारी ते म्हणे माझी भांडीच बरी.
Comments
Post a Comment