रांगोळी आणि मी
रांगोळीचे आणि माझे नाते खूप जुने आहे.
बालपणापासूनच मला कलेची खूप ओढ होती. कधी चित्र काढावे तर कधी चित्र रंगावावे. कधी कलात्मक मांडणी करावी. कधी काही लिहावे. दरवर्षी जशी दिवाळी यावी तसं माझं मन धावायचं रांगोळी कडे.
आधी आई रांगोळी काढत असे. मी आईच्या बाजूला बसून रांगोळी कशी काढतात ते पाहत बसे. एखादा रंग भरायला दे असा आग्रह करत असे. शेवटी माझ्या बडबडीला कंटाळून आई एखादा रंग भरायला देत असे. तो रंग भरून मी पण खुश होत असे. तेव्हा मी ठरवले की मोठी झाल्यावर मी मोठ्या मोठया रांगोळ्या काढीन.
थोडी मोठी (तिसरी चौथी मध्ये घेल्यावर) झाल्यावर मी रांगोळी काढण्याची कामगिरी स्वतः हाती घेतली. चार ठिपक्या पासुन रांगोळी काढायला सुरु केले. पण मजल फक्त 17 ठिपक्यांच्या रांगोळी पर्यंतच जाऊ शकली. मुंबईच्या flat बाहेर कितीशी जागा मिळणार, पण त्यातही माझे समाधान व्हायचे. दिवाळीचे सारे दिवस आमच्या दारापुढे रोज नवी रांगोळी असायची.
शिक्षण पूर्ण करून जेव्हा नोकरी सुरु झाली, तेव्हा मी घरी उशिरा यायचे. कितीही उशीर झाला तरी मी न चुकता रांगोळी काढायचे. एकदा रात्री 9 वाजता मी रांगोळी काढायला सुरुवात केली होती. दिवाळीच्या दिवशी नित्य नियामाने रांगोळी काढायचेच.
मग काही वर्षानंतर वाटले आपल्याला जर रांगोळी काढायला आवडतं तर आपण दिवाळीची वाट का पाहायची. प्रत्येक सांग खासच असतो. रांगोळी नेमही चित्त प्रफुल्लित करणारी असतें. तर आपण प्रत्येक सणाला रांगोळी काढू. आणि तेव्हापासून मी प्रत्येक छोटया किंवा मोठया सणाला दाराबाहेर रांगोळी काढते.
जे आपल्याला आवडतं ते आपण नक्की करावे. YOLO या बाबतीत नक्कीच योग्य आहे. Joy of simple things ही संकल्पना आपल्या समाजात फारशी रुजलेली नाही. पण आपण अश्या साध्या सावयी किंवा आचरणाने त्या रुजवू शकतो.
Comments
Post a Comment