दिवाळी आणि बरंच काही

तो दिवस उजाडला. आजच तो दिवस. आज सगळे भेटणार. दिवाळीच्या एका आठवड्या नंतर का होईना पण भाऊबीजसाठी सगळे येणार. 

खरंच आधी लहानपणी किती वेळा भेट होत असे. आता सगळे स्वतःच्या routine मध्ये गर्क असतात. पण त्याला ही कारण आहे. लहानपणी कुठे ऑफिस होते. लहानपणी कुठे client meetings होत्या. लहानपणी मस्त दिवाळीची सुट्टी (आणि नकोसा दिवाळीचा अभ्यास). 

एरवी खूप कंटाळा करणारे सुद्धा अगदी वेळेवर उठले. Weekend असतानाही लवकर आंघोळी केल्या. इस्त्री नीट घडी असलेले नवीन कपडे घातले. मग वाट बघतली, कोण कधी येतंय. Whatsapp वर विचारायचं का कुठे पोचले की फोन करायचा? पण गाडी चालवत असताना कसे रिप्लाय करेल. ट्रॅफिक लागला असेल कदाचित. जाऊदे येतील सगळे वेळेवर. डोक्यात शंभर विचार. 

ताटे काढली का? एवढी बस होतील कि अजून लागतील? चमचे थोडे जास्त घेऊ. चमचे कितीही असले तरी कमीच पडतात. आणि पेल्यांच काय? Disposable cups घेऊ तेवढाच जरा व्याप कमी. दोन चार सर्विन्ग बाउल्स आणि दोन चार मोठे चमचे वाढायला. पाणी लागेल तेव्हाच भरून घेऊ. बाकी सगळी तयारी झाली.

एका मागोमाग एक सगळे आहे. घर उत्स्फूल्लीत झालं. गप्पा आणि हास्याची मैफिल जमली. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. गप्पा रंगल्या. भावांची ओवाळणी झाली. 

जेवणाची तयारी होत होती आणि गप्पाना ऊत आला. राजकारण, इतिहास, संस्कृती, ऑफिसचे किस्से, नावे अनुभव, अशा नानाप्रकारच्या चर्चा झाल्या. एवढ्यात जेवणाची ताटे आली पण गप्पा मात्र चालू राहिल्या. 

जेवण झाल्यावर पांगपंग सुरु झाली. ज्येष्टांना नमन करून हळूहळू परतीचा मार्ग गाठू लागले. दिवाळी to दिवाळी का आपण लवकर काहीतरी प्लॅन करूया असे ठरले. एकदा कुठेतरी family picnic काढूया असा एक प्लॅन झाला. घरी पोचलात कि family group वर मेसेज टाका अशी common सूचना आली आणि सगळे फोटो group वर टाका अशी विनंती सुद्धा. 

दिवसाची सांगता. आठवणींचा नवा ठेवा. नव्हचैतन्य आणि पुन्हा भेटण्याची आतुरता. 

Comments

Popular posts from this blog

Not a friendly face

The craze of social media

Monochromatic style