सर्वत्र 'गणेशलहरी' पसरल्या आहेत. उद्या सुरू होणाऱ्या भाद्रपदी गणेश महोत्सवाच्या तुम्हा वाचकांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा.
बुधवार दिनांक ९ रोजी युट्युब चॅनेल वरील "पुस्तकालय मराठी" या चॅनलवर माझा "मनातले मैफिलीत" हया शीर्षकाखाली podcast प्रसिद्ध झाला आहे. जरूर ऐका. संपूर्ण चर्चा गणपती संदर्भात आहे.
आता वळूया आजच्या विषयाकडे.
आजीबाईचा बटवा पण मंत्र स्वरूपात
व्याधी.. (जप मंत्र)
नेत्रविकार.. (ॐ शां शांखीनीभ्याम् नमः)
कानाचा विकार..(ॐ द्वाम् द्वारवासीनीभ्याम् नमः)
नाकाचे विकार..(ॐ यम् यमघंटाभ्याम् नमः)
जिभेचे विकार..(ॐ सं सर्वमंगलाभ्याम् नमः)
हृदयरोग..(ॐ लं ललितादेवीभ्याम् नमः)
अल्सर..(ॐ कम् कालरात्रीभ्याम् नमः)
पित्त,आम्लपित्त..(ॐ मुं मुकुटेश्वरीभ्याम् नमः)
गॅस ट्रबल, ब्लड प्रेशर..(ॐ वं वज्रहस्ताभ्याम् नमः)
पोटाचे विकार..(ॐ शुम् शुलधारीणीभ्याम् नमः)
आता घरगुती उपायाकडे बघूया
ताप निघत नसेल तर आजारी माणसाच्या हाताने चिमूटभर मूग दह्यात टाकून ते दही शिवपिंडीवर अथवा पिंपळ/वड यांच्या मुळाशी वाहावे. आश्चर्यकारक अनुभव येतो.
तोंड येणे..त्या ठिकाणी तुरटीची पूड लावावी व नंतर लाळ गाळावी, सोबत "ॐ भगवते नमः" हा मंत्र वीस वेळा म्हणत तुरटीच्या पाण्याने गुळण्या कराव्यात.
जुलाब व आव.. अर्धे जायफळ,अर्धे मायफळ, अर्धीसुंठ दुधात उगाळून घेणे.
उन्हाळी म्हणजेच उष्णतेचे विकार.. धणे, जिरे, आमसूल रात्रभर भिजवून ते पाणी पिणे.
अर्धशिशी.. नाकामध्ये गाईचे तूप दोन थेंब टाकणे किंवा सफेद पेढा अथवा साखर मिश्रित खवा सेवन करणे.
हेही लक्षात असू द्या
- भाताची पेज प्यायल्याने भांगेची नशा उतरते.
- तांदळाच्या पेजेत मध मिसळून प्यायल्याने शरीरास थंडावा जाणवतो व तरतरी येते.
- दही साखर खाण्याने पित्ताचा त्रास कमी होतो.
- काळे वा पांढरे तीळ चावून, चावून खाऊन वर थोडे पाणी प्यायलास दात मजबूत होतात. तसेच आजारातून उठल्यानंतर दहा पंधरा दिवस रोज असे केल्याने अशक्तपणा लवकर दूर होऊन अंगात ताकद येते.
- काटा किंवा काच लागली असता त्या ठिकाणी गूळ गरम करून बांधला असता काटा/काच पटकन बाहेर निघते.
- हिंग पाण्यात टाकून त्याच्या गुळण्या कराव्यात. दातदुखी आटोक्यात येते. Plantgo हे होमोओपॅथी औषध सुद्धा खूप गुणकारी आहे. ते गोळया वं द्रव स्वरूपात मिळते.. द्रवाचे चार पाच थेंब एक ग्लास पाण्यात टाकून गुळण्या कराव्यात.
- लहान बाळास सर्दी झाल्यास त्याच्या कपाळावर व नाकावर कोमट केलेला वेखंड व जायफळ मिश्रित लेप हलकेच लावावा.
- गॅसेस मुळे लहान बाळाचे पोट फुगते, अशावेळी ते अस्वस्थ होते. तर आपण ओवा चावून नंतर त्याची फुंकर बाळाच्या बेंबीवर मारावी. त्वरित आराम मिळतो.
- उलटी होत असल्यास हाताची बोटे ओली करून कानात घाला. बोटे सुकल्यास परत ओली करा, उलटी थांबेपर्यंत याचा प्रयोग करावा.
- नेत्र विकार: सूर्य उपासना हा चाक्षुशीविद्या मंत्र रोज सकाळी पूर्वेकडे तोंड करून म्हणावा. पुढील ब्लॉगमध्ये हा मंत्र अर्थासहित सांगणार आहे. हा मंत्र उपनिषदात आहे.
धन्यवाद.
जय गजानन.

दत्तात्रय फणसे उपयुक्त माहिती 👌
ReplyDelete