ग्रहपीडानिवारण उपाय

 गेल्यावेळी आपण नवग्रह स्तोत्र अर्थासहित व जपसंख्या कशी असावी, याबद्दल बोललो होतो. ते याप्रमाणे.

 


 प्रथम संकल्प सोडावा. संकल्प असा असेल.

अस्मत बलसंवर्धनार्थं, शीलसंरक्षणार्थं, अर्थव्यवस्था-उत्तमस्थिति-प्राप्त्यर्थं, सकलकुटुम्ब-सुखार्थं, सुखसमृद्धि-प्राप्त्यर्थं, श्री [इष्टग्रहाचे नाव] देवता प्रीत्यर्थं जपं अहं करिष्यामि |

सूर्य /रवि (Sun): जपसंख्या ७000

जपाकुसुमसंकाशंकाश्यपेयं महाद्युतिम्।

तमोऽरिं सर्वपापघ्नंप्रणतोऽस्मि दिवाकरम्

जास्वंदाच्या फुलाप्रमाणे लाल कांती असणाऱ्या, कश्यपऋषी पुत्र, महातेजस्वी, अंधाराचा नाश करणाऱ्या, तसेच सर्व पापांचे निर्मूलन करणाऱ्या दिवाकराला म्हणजेच सूर्यादेवाला मी नमस्कार करतो.


चंद्र (moon ): जपसंख्या ११000

दधिशङ्खतुषाराभंक्षीरोदार्णवसंभवम्।

नमामि शशिनं सोमंशम्भोर्मुकुटभूषणम् 

दही, शंख आणि बर्फप्रमाणे शुभ्र कांती असलेल्या क्षीर (दूध) सागरातून उत्पन्न झालेल्या, शंभोमहादेवानी ज्याला आपल्या मस्तकी मुकुटात मानाचे स्थान दिले आहे अश्या शशीला तथा चंद्रदेवाला माझे वंदन.


मंगळ (Mars): जपसंख्या १0000

धरणीगर्भसंभूतंविद्युत्कान्तिसमप्रभम्।

कुमारं शक्तिहस्तंतं मङ्गलं प्रणमाम्यहम् ।।

पृथ्वीच्या गर्भातून ज्याची उत्पत्ती झाली आहे, विद्युलतेप्रमाणे ज्याची  काया तेज:पूंज आहे, शक्ती नामक शस्त्र धारण करणाऱ्या युवारूपी मंगळ देवास माझा नमस्कार.


बुध (mercury): जपसंख्या ९000

प्रियङ्गुकलिकाश्यामंरूपेणाप्रतिमं बुधम्।

सौम्यं सौम्यगुणोपेतंतं बुधं प्रणमाम्यहम् ।।

प्रियांगुनामक वनस्पतीच्या कलिके प्रमाणे सावळ्या वर्ण|च्या व अतीव सुंदर भासणाऱ्या, शांत स्वभावाच्या तथा शुभ गुणांनी संपन्न असणाऱ्या बुधदेवास माझे वंदन.


गुरु /बृहस्पती.. (Jupiter): जपसंख्या १९000

देवानां च ऋषीणां चगुरुं काञ्चनसंनिभम्।

बुद्धिभूतं त्रिलोकेशंतं नमामि बृहस्पतिम्

देव तसेच ऋषींचे गुरुपद भूषवणाऱ्या, सोन्याप्रमाणे पीतवर्णीय व बुद्धीचा महासागर असणाऱ्या, तिन्ही लोकांचे स्वामी असलेल्या बृहस्पतीना (गुरुदेवास) मी नमस्कार करतो.


शुक्र (venus).. जपसंख्या १६000

हिमकुन्दमृणालाभंदैत्यानां परमं गुरुम्।

सर्वशास्त्रप्रवक्तारंभार्गवं प्रणमाम्यहम् ।।

बर्फ, कुंदाचे फुल व कमलदेठप्रमाणे शुभ्रधवल कांती असलेल्या, तसेच दैत्यांचे परमगुरू असणाऱ्या व सर्व शास्त्राचे ज्ञान प्रदान करणाऱ्या, भ्रूगूपुत्र शुक्रदेवास माझे वंदन.


शनी (Saturn): जपसंख्या २३000

नीलांजनसमाभासंरविपुत्रं यमाग्रजम्।

छायामार्तण्डसंभूतंतं नमामि शनैश्चरम् ।।

ज्याचे डोळे निळे आहेत, अश्या सूर्यदेव व छायादेवी यांचा पुत्र असलेल्या व जो यमदेवांचा जेष्ठ बंधू म्हणून ज्ञात आहे त्या शनिदेवास माझा नमस्कार.


राहू (Rahu): जपसंख्या १८000

अर्धकायं महावीर्यंचन्द्रादित्यविमर्दनम्।

सिंहिकागर्भसंभूतंतं राहुं प्रणमाम्यहम् ।।

ज्याचे शरीर अर्धे आहे, जो महापराक्रमी आहे, सूर्य व चंद्र यांना पीडा (ग्रहण) देणाऱ्या अश्या सिंहिकेच्या गर्भातून उत्पन्न झालेल्या राहुदेवास माझे वंदन.


केतू (ketu): जपसंख्या  १७000

पलाशपुष्पसंकाशंतारकाग्रहमस्तकम्।

रौद्रं रौद्रात्मकं घोरंतं केतुं प्रणमाम्यहम् ।।

पळसाच्या फुलाप्रमाणे रक्त व राखाडी वर्ण असलेल्या, सर्व तारे व ग्रहामध्ये प्रमुख असणाऱ्या, भयंकर व रौद्ररुप धारण करणाऱ्या केतूदेवास माझा नमस्कार.

महर्षी व्यासांच्या मुखातून प्रकट झालेला हा मंत्र जो नित्य पठण करेल त्याच्यावरील सर्व विघ्नांचे निवारण निश्चित होते... पठण करण्यास कालावधीचे बंधन नाही, हवी एकाग्रता.

टीप: प्रत्येक ग्रहासाठी जापसंख्या दिली आहे... जप प्रारंभ करण्यापूर्वी 'मला वांच्छित फलप्राप्ती लाभो' अशी मनोमनी प्रार्थना करुन व संकल्प मंत्र म्हणून जपास आरंभ करावा... संपूर्ण जप एकटाकी केला पाहिजे असे बंधन नाही.. शक्यतो ३/४ दिवसात पूर्ण होईल असे नियोजन करा.

आपणास ह्या मंत्रपठणांचे उचित फळ लाभो ही प्रार्थना.🙏

Comments

  1. दत्तात्रय फणसे मराठीत सुंदर transletion

    ReplyDelete

Post a Comment