शालेय जीवनात आपण प्रतिध्वनीबद्दल वाचले आहे. नामस्मरण, मंत्र इत्यादीला सुद्धा हे लागू पडते.. कसे हे पाहूया...
ज्या दैवी शक्तीचे नामोच्चारण करतो, तेव्हा ध्वनीलहरी निर्माण होतात. ह्यांची कंपन संख्या व तीव्रता त्यांना दूरवर घेऊन जाते. ज्यावेळी ह्या ध्वनीलहरी ज्या शक्तीची उपासना चालू आहे, त्या शक्तीला स्पर्श करतात. आणि मग त्या शक्तीची ऊर्जा घेऊन माघारी येतात.. जर आपले मन एकाग्र चित्ताने जप /मंत्रपठण करीत असेल तर आणि तरच ही ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचते.. थोडक्यात 'उपास्यशक्तीचा' कृपाप्रसाद प्राप्त होतो... ह्या साठी तीन स्तर आहेत..
1.स्पष्ट उच्चार
2.अर्थाचे आकलन.
3.एकाग्रता.
नाहीतर कितीदा म्हटले तरी व्हावा तसा परिणाम जाणवत नाही.
"शिवम् भूत्वा शिवम् भजेत" हे तत्व अंगीकारावे. ज्या शिवाची मी आराधना करीत आहे, त्याचा मी एक अंश आहे हे स्मरून आराधना केली असता, आपण आराध्याच्या जवळ पोहोचते, जेणेकरून त्याचा कृपालाभ लवकर प्राप्त होतो हे नि:संशय खरे ठरेल...
तेव्हा मंडळी हे ध्यानी असुद्या.
सर्वात महत्वाचे म्हणजे ध्वनीलहरी उत्पन्न होतील एवढी आपल्या पठणाच्या स्वराची पातळी असावी... म्हणूनच मंत्रौच्चाराण हा शब्द आला.. (मंत्र उच्चारण)
समुदाईक मंत्रपठण होते त्या ठिकाणी एक वेगळीच ऊर्जा जाणवते ह्याची अनुभूती आपण नक्कीच घेतली असेल..
या युगात लोक ज्योतिष वा तत्सम विद्या अवगत असणाऱ्यांचे मार्गदर्शन घेत असतात.. ज्यांना ग्रहाचे रत्न परिधान करणे उचित वाटत नाही अथवा खर्चिक वाटते, त्यांना त्या ग्रहाच्या मंत्राचा जप करा असे सांगितले जाते... ह्यासाठी उत्तम उपाय आहे "नवग्रह स्तोत्र". प्रत्येक ग्रहासाठी एक मंत्र आहे व त्याची जापसंख्याही ठरलेली आहे.. पुढील सदरात हे मंत्र अर्थासहित व किती संख्येने करावेत याविषयीं लिहिण्याचा मानस आहे.

खूप छान लिहिलंय
ReplyDeleteThank you
Deleteफारच छान 👍👍
ReplyDeleteThank you
Deleteदत्तात्रय फणसे खूप छान
ReplyDeleteThank you
Delete