Skip to main content

गुरुपौर्णिमा: कृतज्ञतेचा दिवस


माझ्या वाचक गुरूंना गुरुपौर्णिमेनिमित्य विनम्र अभिवादन. येत्या बुधवारी दिनांक २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमेचा मंगलदिन आहे. सर्वत्र गुरुलहरी म्हणजेच दत्तलहरींचा प्रभाव जाणवतो.

या दिवसाला व्यासपौर्णिमा असेही संबोधले जाते. या दिवशी महर्षी व्यासांनी पृथ्वीवर पुनर्जन्म घेतला, अशी हिंदू धर्मात व संन्यासी जगतात धारणा आहे. 

याचा संदर्भ धरता, या दिनी संन्यस्त मंडळी व्यासपूजेचे आयोजन करीत असावेत. आता कलियुगात मात्र शिष्य, गुरुची पूजा करतो असे दिसते. लौकिक अर्थाने नाही असे मी मानतो. 

गुरु या शब्दाची फोड करता असे लक्षात येते की गु: म्हणजे अंधकार तर रु म्हणजे नाहीसा करणारा. थोडक्यात "अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करून ज्ञानरूपी प्रकाश प्रदान करणारा व योग्य मार्गावर जो आणतो तोच गुरु". 

ज्याला तुम्ही गुरुस्थानी मानता तो किंवा ती असे मार्गदर्शन देतात का? याचे परीक्षण करावयास काही हरकत नाही.

मी राजकारणातील गुरु-शिष्य या जोडीचा इथे विचारच करत नाही, हे ध्यानी असू द्या.

गुरु म्हणजे GURU थोडक्यात जी यु आर यु म्हणजेच आपल्यासारखे आपणच. गुरुसाठी हे किती चपखल बसते हे आपल्यास पटेल.

आद्य गुरुस्थानी श्री दत्त महाराज आहेत, हे त्रिकालाबाधित सत्य सर्वमान्य आहे.

व्यास या नावाचा भूमितीशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करूया.

वर्तुळातील व्यास ही सर्वात मोठी जीवा (chord) असते. म्हणून कदाचित सर्वश्रेष्ठ गुरु म्हणून व्यास महर्षी व वर्तुळ म्हणजे विश्व व्यापणारी आपली गुरुमाऊली. व्यवहारात जोवर आपले गणित ठीकठाक नसते, तोवर यश हुलकावणी देत असते. मी गणिताचा विद्यार्थी व शिक्षक अशा दुहेरी भूमिकेतून आयुष्याची वाटचाल करीत आलो आहे, हे तुम्हास वेगळे सांगणे न लगे. तरी कृपया गैरसमज करून घेऊ नका.

आपल्यातील सत्कर्मे जसजशी वाढत जातात, तसतसे आपल्यातील अंगीभूत गुरुतत्त्वाची जाणीव आपल्याला होऊ लागते. अर्थात गुरु शोधावा लागत नाही, तो आपल्या जवळच असतो. असे असेल तर गुरु करण्याची आवश्यकताच नाही. तरीही सत्कर्म करण्याचे मार्गदर्शन होण्यासाठी कोणीतरी मार्गदर्शक म्हणजेच गुरु असावाच........ मग तो जन्मदाते माता-पिता, बंधू-भगिनी, सखा, विद्यादान देणारे शिक्षक अथवा कार्यालयातील आपले सहकारी. ह्यातील जी मंडळी निरलस वृत्तीने आपल्या पाठीशी सदैव सावलीसारखे उभे असतात, हेच स्मरून त्यांचा यथोचित आदर सदैव असावा. ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मग गुरुपौर्णिमेशिवाय इतर दुसरा कुठला शुभ दिवस असू शकतो?

पूर्वसंचित व या जन्मी आपल्या हातून कळत नकळत घडणाऱ्या कृतींचे काही प्रमाणात फलित या जन्मीच भोगावे लागते. अशावेळी गुरु आपल्याला  भरकटू देत नाही. जर भोग भोगावयाचे असतील, तर त्याची तीव्रता सहन करण्याची ताकद गुरुबळामुळे प्राप्त होते. आपला त्रास सुसह्य होतो.

 गुरु हेअसे वलय आहे की जे अखंड आहे म्हणूनच गुरुआज्ञेचे पालन हीच खरी गुरुदक्षिणा.

 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥'

एक नम्र विनंती. Blog वाचून झाल्यावर आपली प्रतिक्रिया blog च्या खाली comments मध्ये आपल्या नावासहित द्या. त्यामुळे एकसंघ वाचन सोपे होते व इतरानासुद्धा share करता येते.

Comments

  1. दत्तात्रय फणसे 🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रथम वंदन

नमस्कार मंडळी.  माझ्या "श्रीगणेश पूजा विधि" या गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या पुस्तकाला गणेश भक्तांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. यामुळे मला मिळालेली उमेद असे सांगत होती की आपल्या हिंदू धर्मात अशा अनेक प्रथा आहेत आणि अशी माहिती आहे जी आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. ती जतन करणे आवश्यक आहे जसे की आजीबाईचा बटवा इत्यादी. याच्या अनुषंगाने मी विविध विषयांना आजपासून स्पर्श करण्याचा आणि ते विषय आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. अपेक्षा ही आहे की माझा हा संकल्प आपल्या पसंतीस उतरेल. कुठल्याही कामाची सुरुवात करताना गणेशाला वंदन करूनच आपण करतो.  ॐ गं गणपतये नमः | अष्टविनायकांची नावे याप्रमाणे:  मोरगावचा मयुरेश्वर  सिद्धटेकीचा सिद्धिविनायक  पालीचा बल्लाळेश्वर  मढचा वरदविनायक  थेऊरचा चिंतामणी  लेण्याद्रीचा गिरिजात्मक  ओझरचा विघ्नेश्वर  आणि आठवा रांजणगावचा महागणपती वाचकहो, ही सुरुवात आहे. दर आठवड्यातून एकदा मी आपल्या भेटीस येईन. प्रत्येक वेळी विषय वेगळा असेल, अशी माझी अशी माझी संकल्पना आहे. - आनंद कृष्णाजी कणेक...

अधिक मास व सहस्त्रचंद्रदर्शन

नुकताच अधिक मास समाप्त झाला. काहीजण त्याला मलमास, धोंडा मास, किंवा पुरुषोत्तम मास असेही संबोधतात. हा अधिक मास कसा झाला हे समजावून घेऊ. प्रत्येक महिन्यासाठी एक विशेष देवता आहे. अधिक मासाला मात्र देवता नव्हती. तरीही हा मास श्रेष्ठ मानला जातो तो कसा?  थोडे त्याच्या निर्मिती विषयी. श्री महर्षी व्यास सांगतात, एका वर्षातील बारा महिने म्हणजे एक चांद्र वर्ष होते त्याचा कालावधी अंदाजे ३५४   दिवसांचा. तर एका वर्षातील सूर्याचे बारा राशीतून संक्रमण म्हणजे एक सौर वर्ष. त्याचा कालावधी अंदाजे ३६५  दिवसांचा. त्यामुळे चंद्र वर्ष व सौर्य वर्ष यात दहा-अकरा दिवसांचा फरक पडतो. कालगणनेचा ताळमेळ बसण्यासाठी या दोघांचा मेळ बसवणे क्रमप्राप्त झाले. साधारण दर अडीच वर्षात ह्यामुळे तीस दिवसाचा फरक पडला, म्हणून चांद्र वर्षात एक अधिक मास घेऊन हे सांगड घातली गेली. आता हा महिना कसा ठरवावा? तर ज्या महिन्यात सूर्याचे राशी संक्रमण होत नाही, तो हा महिना धरला गेला. त्यामुळे त्या चांद्र वर्षात बारा ऐवजी तेरा महिने झाले. हा तेरावा महिना म्हणजेच अधिक मास. अधिक महिन्यात ठराविक ऋतू, सणवार, संक्रांत येत नव्हते. लग्न...

भेटीतला बंदा रुपया

शुभप्रसंगी भेट देणे ही प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. पूर्वी ती धातू स्वरूपात असे.. जसे की तांब्या-पितळेची भांडी, चांदीच्या वस्तू (उदाहरणार्थ पेला, वाटी, लामण दिवा,छल्ला, चौफुला, हळद कुंकवाचा करंडा, अत्तरदाणी, गुलाबदाणी), तर सोन्यामध्ये (कर्णफुले, हार, चेन, ब्रेसलेट, अंगठी, कडे इत्यादी).. दिवस पुढे जात होते व भेट स्वरूप पण बदलले.. मग आले स्टीलचे डिनर सेट, चांदी-सोन्याची नाणी.. आता चांदी-सोन्याचा दर पाहता हे लुप्त पावत आहे.. आधीच असलेल्या व वापरात नसलेल्या स्टील, क्रोकरीच्या वस्तू या भेट स्वरूपात आलेल्या असूनही वापरल्या जात नाहीत.. उलट त्याचे काय करायचे असा प्रश्न निर्माण होतो. अशावेळी छोट्या व टोकन स्वरूपात भेट म्हणून पाकिटात रोख रक्कम भरून दिली जाते. ती शंभर रुपये, पाचशे रुपये, हजार रुपये अशी नसते तर ती एकशे एक रुपये, पाचशे एक रुपये, एक हजार एक रुपये अशा स्वरूपात असते..आपण कधी याचा विचार केला आहे का, की हा एक रुपया अधिक स्वरूपात भेटीत का समाविष्ट केला जातो...... या मागचा विचार असा आहे..   शून्य हे अंत म्हणजेच शेवट दर्शवते. तर एक अंक ' नवीन सुरुवात'  याचे द्योतक आहे. कद...