Skip to main content

बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल


येत्या २५ तारखेला, शनिवारी आषाढी एकादशी हा पवित्र सण साऱ्या महाराष्ट्रात व कर्नाटकात उत्साहात साजरा केला जाईल.

 "विटेवरी उभा कटेवरी हात, काय मौजेचा पंढरीनाथ."

 मंडळी, हल्लीच्या सेल्फीच्या जमान्यात फोटोतील पोझ निरीक्षली जाते. आता आपण आपल्या लाडक्या विठुरायाचे निरीक्षण करू. त्याची पोझ एकच.. ती म्हणजे विठोबाचे दोन्ही हात कटीवर म्हणजेच कंबरेवर आहेत. नीट पाहता असे दिसेल की हाताचे पंजे वरील बाजूस आहेत. उजवा तळहात लिव्हरवर तर डावा स्प्लिनवर आहे. उजवा तळहात दक्षिण ध्रुव दर्शवितो, तर डावा तळहात उत्तर ध्रुव दाखवतो.. वैद्यकीय दृष्ट्या विचार केला असता असेही असू शकते की पोटात निर्माण झालेले गॅसेस छातीकडे सरकू लागतात व त्यामुळे छाती भरून येणे, जड वाटणे अशी लक्षणे जाणवू लागतात. हार्ट अटॅक येतोय की काय अशी भीती वाटू लागते. यावेळी आपण विठुरायासारखे दोन्ही बरगड्या खाली हाताचे तळवे धरल्यास बघा काय होते.. लिव्हरकडून छातीकडे सरकणारे गॅसेस परत मागे फिरतात व नंतर बाहेर पडतात. छातीत शिरतच नाही. 

हेच कशाला... असाही अनुभव आहे की छातीत प्रेशर निर्माण होत असल्यास अथवा वेदना होत असल्यास विठ्ठलाच्या आपल्याला माहित असलेल्या पोझ मध्ये राहून "विठ्ठल, विठ्ठल" असे उच्चारण जमेल तितक्या वेळा करावे. बघा आराम (रिलीफ) पाच एक मिनिटातच मिळतो. अर्थात हा प्रयोग करून थांबू नये. डॉक्टरकडे जाण्याआधी ही कृती "प्रिव्हेंटिव्ह मेझर" म्हणून ट्राय करण्यास काहीच धोका नाही.

 "श्रीहरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल ||".

Comments

  1. अप्रतिम 👍

    ReplyDelete
  2. दत्तात्रय फणसे उपयुक्त माहिती

    ReplyDelete
  3. खूप छान, न माहित असलेली माहिती मिळाली. धन्यवाद - अजय

    ReplyDelete

Post a Comment