श्री रामरक्षा स्तोत्र सिद्धी विधी

 अध्याय तिसरा


असा हिंदू सापडणे नाही की ज्याची प्रमुरामचंद्रावर श्रद्धा नाही. हे गृहीत धरले तर आपसुकच मनात श्री रामरक्षा रुंजी घालू लागते.

बुधकौशिक ऋषींनी रचलेले हे अनुष्टूप छंदातील काव्य व त्यातील प्रत्येक चरण ज्ञानामृताचा नवीन झरा उत्पन्न करते.

आज अनेक राम भक्तांच्या घरी रामरक्षा पठण हा नित्यउपक्रम आहे. त्यामुळे निर्माण होणारी ऊर्जा अवर्णनीय आहे.

या साऱ्याचा विचार करता असे मनात आले की पूर्वी ऋषीमुनी एखादा मंत्र सिद्ध करीत असत आणि अशा सिद्ध मंत्राचा उपयोग समाजाच्या भल्या करता करीत असत. मग आपण रामरक्षा सिद्ध का करू नये? हा विचार मनी धरून मी माझे आध्यात्मिक गुरु परमपूज्य डॉक्टर वसंत पांडुरंग परांजपे यांना विचारले.. त्यांनी मला श्री रामरक्षा सिद्ध कशी करावी याबाबतीतील विधी व मार्गदर्शन केले. हे आपल्यापर्यंत पोहोचण्याची भावना माझ्या मनी निर्माण झाली व त्यातूनच आजचा ब्लॉग 

विधी याप्रमाणे...

  • चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी हे नऊ दिवस अळणी उपवास करावा. 
  • मिठाचे पदार्थ टाळावे. बाकी सर्व खाऊ शकतो. 
  • दहावे दिवशी असा उपवास सोडावा. 
  • या नऊ दिवसात ब्रह्मचर्य पाळावे, सत्य बोलावे, निंदा-चहाडी टाळावी, मन व शरीर शुद्ध ठेवावे.
  • श्री रामाचे चित्र आपल्यासमोर ठेवावे. 
  • निरांजन लावावे व श्री राम रक्षा स्तोत्र सिद्धीसाठी संकल्प करावा.
  • तदनंतर एक माळ गायत्री मंत्र जपावा व एक माळ हनुमान कवचाचे पठण करावे. (हनुमान कवच उपलब्ध नसेल तर हनुमानचालीसाचे पठण करावे)
  • नंतर संपूर्ण रामरक्षा स्तोत्र अकरा वेळा म्हणावे त्यानंतर पुन्हा गायत्री मंत्राची एक माळ जपावी.
  • असे नऊ दिवस करावे.
  • या नऊ दिवसात जसे जमेल तसा "ॐ श्रीरामाय नमः" अथवा "श्रीराम जय राम जय जय राम" वा तत्सम मंत्र जपावा.
  • समाप्तीचे रात्री होम व ब्राह्मण भोजन करावे.
असे केले असता श्री रामरक्षा सिद्ध होते.

हे ९९  (९ X ११) पाठ तारणहार आहेत. सिद्ध झाल्यावर कुठलाही रोग व भूत पिशाच्च बाधा झालेल्या  व्यक्तीच्या जवळ बसून, हातात विभूती घेऊन रामरक्षा म्हणावी व ती अभिमंत्रित विभूती आजारी किंवा बाधित व्यक्तीस लावावी.  फरक जाणवतोच.

'स्वार्थासाठी याचा उपयोग कधीच करू नये'

एक वेळा उच्चारलेले रामनाम सहस्त्रवेळी उच्चारलेल्या विष्णू नामाचे पुण्य प्रदान करते. रामरक्षेत तसा उल्लेख आहे.

 राम रामेति रामेति ,रमे रामे मनोरमे, सहस्त्रनाम तत्तुल्यमं राम नाम वरानने |

 हा प्रयोग जरूर करून पहा. फलप्राप्ती नक्कीच होईल. 

 जय श्री राम! 🙏

पुढील भेटीत नवीन विषय नवा विचार. 

Comments

Post a Comment