Skip to main content

अधिक मास व सहस्त्रचंद्रदर्शन

नुकताच अधिक मास समाप्त झाला. काहीजण त्याला मलमास, धोंडा मास, किंवा पुरुषोत्तम मास असेही संबोधतात. हा अधिक मास कसा झाला हे समजावून घेऊ.

प्रत्येक महिन्यासाठी एक विशेष देवता आहे. अधिक मासाला मात्र देवता नव्हती. तरीही हा मास श्रेष्ठ मानला जातो तो कसा? 

थोडे त्याच्या निर्मिती विषयी. श्री महर्षी व्यास सांगतात, एका वर्षातील बारा महिने म्हणजे एक चांद्र वर्ष होते त्याचा कालावधी अंदाजे ३५४ दिवसांचा. तर एका वर्षातील सूर्याचे बारा राशीतून संक्रमण म्हणजे एक सौर वर्ष. त्याचा कालावधी अंदाजे ३६५ दिवसांचा. त्यामुळे चंद्र वर्ष व सौर्य वर्ष यात दहा-अकरा दिवसांचा फरक पडतो. कालगणनेचा ताळमेळ बसण्यासाठी या दोघांचा मेळ बसवणे क्रमप्राप्त झाले. साधारण दर अडीच वर्षात ह्यामुळे तीस दिवसाचा फरक पडला, म्हणून चांद्र वर्षात एक अधिक मास घेऊन हे सांगड घातली गेली. आता हा महिना कसा ठरवावा? तर ज्या महिन्यात सूर्याचे राशी संक्रमण होत नाही, तो हा महिना धरला गेला. त्यामुळे त्या चांद्र वर्षात बारा ऐवजी तेरा महिने झाले. हा तेरावा महिना म्हणजेच अधिक मास.

अधिक महिन्यात ठराविक ऋतू, सणवार, संक्रांत येत नव्हते. लग्नाचे किंवा इतर मंगलमुहूर्त काढले जात नव्हते. त्याला देवता नाही, त्यामुळे अधिक मास कष्टी झाला. त्याने श्रीविष्णूंची उपासना केली. प्रसन्न झालेल्या श्रीविष्णूंने त्याला सांगितले... तुला देवता नाही, स्वामी नाही.. चल माझ्यासोबत. त्याला त्यांनी श्री मुरलीधर पुरुषोत्तमाचे दर्शन घडवले. त्याच्या मनीची व्यथा जाणून करुणासिंधू पुरुषोत्तमाने त्याला वरदान दिले.. 'यापुढे तुला माझ्या नावाने म्हणजे पुरुषोत्तम मास असे म्हटले जाईल. या मासात जो कोणी पुण्य कर्म करील त्यांचे मनोरथ मी पूर्णत्वास नेईन. अशा रीतीने हा अशुभ मास शुभ झाला. आता या अधिक मासात आपण सारे जण विविध प्रकारच्या धर्मकृत्यांमध्ये मग्न राहतो आणि एक विधी म्हणून जावयास वाण देतो.

 या अधिक मासाचे आणि सहस्त्रचंद्रदर्शन याचा काय संबंध आहे हाय विचार करूया 


 ७९ वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा ८० वर्षे पूर्ण झाल्यानंतर सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा करण्याचे आयोजित केले जाते. परंतु सहस्त्र या शब्दाचा विचार केला असता हे योग्य नाही असे मला वाटते. ८१ वर्षे पूर्ण होत तेव्हा ८१ X १२ म्हणजेच ९७२ वेळा त्या व्यक्तीचे आयुष्यात पौर्णिमा आलेली असते. तसेच तीन वर्षाच्या कालावधीत एक अधिक मास म्हणजे ८१ वर्षांमध्ये २७ (८१ ÷ ३) वेळा अधिक मास येतात. तत्परत्वे २७ पौर्णिमा येतात म्हणजेच ८१ वर्षे पूर्ण होतात त्यावेळी ९७२ + २७ म्हणजेच ९९९ वेळा पौर्णिमा अर्थात पूर्ण चंद्रदर्शन त्या व्यक्तीस होत असते. ही व्यक्ती त्यावेळी हजारावा पूर्णचंद्र पाहते, ज्यावेळी ८१  वर्ष पूर्ण झाल्यानंतर येणारी पौर्णिमा त्याच्या आयुष्यातील १००० पूर्ण चंद्र दर्शन घडवते. थोडक्यात सहस्त्रचंद्रदर्शन म्हणून माझे मत असे आहे की सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा हा व्यक्तीच्या ८१ वर्ष पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेस साजरा करण्यात यावा. ही वेळ साधता आली नाही तर नंतर येणारी कोणतीही तिथी आपण या उपक्रमासाठी धरू शकतो.

अधिक मास व सहस्त्रचंद्रदर्शन यांची सांगड घालणारा माझा विचार कसा वाटला? नवीन विचार व माहितीसह लवकरच भेटू.

Comments

  1. सुंदर माहिती.

    ReplyDelete
  2. फारच उपयुक्त माहिती . नविन पिढीला आपल्या धार्मिक विधींची माहिती होईल. छान उपक्रम. अभिनंदन !

    ReplyDelete
  3. अतिशय उपयुक्त माहिती

    ReplyDelete
  4. खूप छान माहिती आहे

    ReplyDelete
  5. Nice information

    ReplyDelete
  6. Good information which was not known to me earlier. Thanks for sharing dear.

    ReplyDelete
  7. खूप छान मुद्दे सूद माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  8. खूप छान माहिती.

    ReplyDelete
  9. फारच उपयुक्त माहिती ...

    ReplyDelete
  10. आदरणिय महोदय, आपल्या हिंदू धर्मातील सर्व सण आणि रूढी परंपरा आहे, यांचा अद्भूत अनुभव आम्ही पेठे नगर वासिय घेत आलो आहोत, आपल्या अद्भूत आणि अलौकिक ज्ञानाचा अनूभव सर्वांना घेण्याचे मनांवर आपण घेतल्या मूळ आम्हाला सर्वांच्या ज्ञानात भर पडल्या शिवाय रहाणार नाही, इतर वेळीही आम्ही आमच्या समोर उद्भवणाऱ्या समस्या आपल्या समोर मांडतो आणि आपण सदैव आम्हाला मार्गदर्शन करता, म्हणूनच आपणांस विनंती आहे कि, आपण आपल्या ब्लॉगमधून अधिक सुटसुटीत माहिती देत रहावी, त्या माहितीचे संकलन करून आपल्या या क्षेत्रातील अनुभव पहाता पूस्तक हि प्रसिद्ध करणे सोपे जाईल व वाचकांना आपल्या संग्रही पूस्तक पिढ्यांन पिढ्या जतन करून ठेवता येईल! आपले सदैव मार्गदर्शन ब्लॉग वाचकांना मिळत रहावे, हिच देव वेतोबाच्या चरणी प्रार्थना!
    --अविनाश चमणकर

    ReplyDelete
  11. माझ्या बालबुद्धिनुसार प्रयत्न सुरु आहेत. ही एक समाज सेवा आहे अशी माझी धारणा आहे. तुमच्या सारख्या आप्त व मित्रांचे आशिर्वाद नेहमी लाभोत ही ईश्वरचणी प्रार्थना.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रथम वंदन

नमस्कार मंडळी.  माझ्या "श्रीगणेश पूजा विधि" या गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या पुस्तकाला गणेश भक्तांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. यामुळे मला मिळालेली उमेद असे सांगत होती की आपल्या हिंदू धर्मात अशा अनेक प्रथा आहेत आणि अशी माहिती आहे जी आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. ती जतन करणे आवश्यक आहे जसे की आजीबाईचा बटवा इत्यादी. याच्या अनुषंगाने मी विविध विषयांना आजपासून स्पर्श करण्याचा आणि ते विषय आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. अपेक्षा ही आहे की माझा हा संकल्प आपल्या पसंतीस उतरेल. कुठल्याही कामाची सुरुवात करताना गणेशाला वंदन करूनच आपण करतो.  ॐ गं गणपतये नमः | अष्टविनायकांची नावे याप्रमाणे:  मोरगावचा मयुरेश्वर  सिद्धटेकीचा सिद्धिविनायक  पालीचा बल्लाळेश्वर  मढचा वरदविनायक  थेऊरचा चिंतामणी  लेण्याद्रीचा गिरिजात्मक  ओझरचा विघ्नेश्वर  आणि आठवा रांजणगावचा महागणपती वाचकहो, ही सुरुवात आहे. दर आठवड्यातून एकदा मी आपल्या भेटीस येईन. प्रत्येक वेळी विषय वेगळा असेल, अशी माझी अशी माझी संकल्पना आहे. - आनंद कृष्णाजी कणेक...

पत्ते आणि बोध

आज आपण मनोरंजनाचे साधन व धर्म यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी मी पत्त्याचा कॅट हे साधन वापरणार आहे.  कॅट मध्ये ५२ पत्ते असतात व एक किंवा दोन जोकर असतात. म्हणजेच कमाल पत्ते ५४, रंग दोन - ' लाल व काळा ' व प्रकार ४ - ' इस्पिक , बदाम , किलवर , चौकट '. दोन रंग म्हणजे ' दिवस आणि रात्र '. चार प्रकार म्हणजे चार आश्रम - ब्रह्मचर्य , गृहस्थाश्रम , वानप्रस्थाश्रम , व संन्याशाश्रम . अथवा चार उपाय  - साम , दाम , दंड , भेद अथवा चार वेद  - ऋग्वेद , यजुर्वेद , सामवेद , व अथर्ववेद . एका चांद्रवर्षात ५२ आठवडे येतात हे ५२ आठवडे म्हणजे आपले  ५२ पत्ते. प्रत्येक प्रकारात १३ पत्ते म्हणजे ४×१३ = ५२  आठवडे झाले.  या ५२ पत्त्यांची म्हणजेच एक्का ते राजा यांची बेरीज ३६४ होते त्यात जोकर धरला की झाले ३६५ म्हणजे एक चांद्रवर्ष. दुसरा जोकर समाविष्ट केला तर बेरीज होते ३६६  म्हणजेच ' लीप वर्ष '. ५२ पत्त्यात बारा चित्रपत्ते असतात.. गुलाम , राणी , राजा म्हणजेच ४×३ = १२ यांना आपण बारा महिने संबोधूया.   आता पत्त्यांचा अर्थ लावूया    दुर्री - दोन ग्रह...