नुकताच अधिक मास समाप्त झाला. काहीजण त्याला मलमास, धोंडा मास, किंवा पुरुषोत्तम मास असेही संबोधतात. हा अधिक मास कसा झाला हे समजावून घेऊ.
प्रत्येक महिन्यासाठी एक विशेष देवता आहे. अधिक मासाला मात्र देवता नव्हती. तरीही हा मास श्रेष्ठ मानला जातो तो कसा?
थोडे त्याच्या निर्मिती विषयी. श्री महर्षी व्यास सांगतात, एका वर्षातील बारा महिने म्हणजे एक चांद्र वर्ष होते त्याचा कालावधी अंदाजे ३५४ दिवसांचा. तर एका वर्षातील सूर्याचे बारा राशीतून संक्रमण म्हणजे एक सौर वर्ष. त्याचा कालावधी अंदाजे ३६५ दिवसांचा. त्यामुळे चंद्र वर्ष व सौर्य वर्ष यात दहा-अकरा दिवसांचा फरक पडतो. कालगणनेचा ताळमेळ बसण्यासाठी या दोघांचा मेळ बसवणे क्रमप्राप्त झाले. साधारण दर अडीच वर्षात ह्यामुळे तीस दिवसाचा फरक पडला, म्हणून चांद्र वर्षात एक अधिक मास घेऊन हे सांगड घातली गेली. आता हा महिना कसा ठरवावा? तर ज्या महिन्यात सूर्याचे राशी संक्रमण होत नाही, तो हा महिना धरला गेला. त्यामुळे त्या चांद्र वर्षात बारा ऐवजी तेरा महिने झाले. हा तेरावा महिना म्हणजेच अधिक मास.
अधिक महिन्यात ठराविक ऋतू, सणवार, संक्रांत येत नव्हते. लग्नाचे किंवा इतर मंगलमुहूर्त काढले जात नव्हते. त्याला देवता नाही, त्यामुळे अधिक मास कष्टी झाला. त्याने श्रीविष्णूंची उपासना केली. प्रसन्न झालेल्या श्रीविष्णूंने त्याला सांगितले... तुला देवता नाही, स्वामी नाही.. चल माझ्यासोबत. त्याला त्यांनी श्री मुरलीधर पुरुषोत्तमाचे दर्शन घडवले. त्याच्या मनीची व्यथा जाणून करुणासिंधू पुरुषोत्तमाने त्याला वरदान दिले.. 'यापुढे तुला माझ्या नावाने म्हणजे पुरुषोत्तम मास असे म्हटले जाईल. या मासात जो कोणी पुण्य कर्म करील त्यांचे मनोरथ मी पूर्णत्वास नेईन. अशा रीतीने हा अशुभ मास शुभ झाला. आता या अधिक मासात आपण सारे जण विविध प्रकारच्या धर्मकृत्यांमध्ये मग्न राहतो आणि एक विधी म्हणून जावयास वाण देतो.
या अधिक मासाचे आणि सहस्त्रचंद्रदर्शन याचा काय संबंध आहे हाय विचार करूया
अधिक मास व सहस्त्रचंद्रदर्शन यांची सांगड घालणारा माझा विचार कसा वाटला? नवीन विचार व माहितीसह लवकरच भेटू.

सुंदर माहिती.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteफारच उपयुक्त माहिती . नविन पिढीला आपल्या धार्मिक विधींची माहिती होईल. छान उपक्रम. अभिनंदन !
ReplyDeleteधन्यवाद
Deleteअतिशय उपयुक्त माहिती
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखूप छान माहिती आहे
ReplyDeleteधन्यवाद
DeleteNice information
ReplyDeleteThank you
DeleteGood information which was not known to me earlier. Thanks for sharing dear.
ReplyDeleteThank you
Deleteखूप छान मुद्दे सूद माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखूप छान माहिती.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteफारच उपयुक्त माहिती ...
ReplyDeleteThank you
Deleteआदरणिय महोदय, आपल्या हिंदू धर्मातील सर्व सण आणि रूढी परंपरा आहे, यांचा अद्भूत अनुभव आम्ही पेठे नगर वासिय घेत आलो आहोत, आपल्या अद्भूत आणि अलौकिक ज्ञानाचा अनूभव सर्वांना घेण्याचे मनांवर आपण घेतल्या मूळ आम्हाला सर्वांच्या ज्ञानात भर पडल्या शिवाय रहाणार नाही, इतर वेळीही आम्ही आमच्या समोर उद्भवणाऱ्या समस्या आपल्या समोर मांडतो आणि आपण सदैव आम्हाला मार्गदर्शन करता, म्हणूनच आपणांस विनंती आहे कि, आपण आपल्या ब्लॉगमधून अधिक सुटसुटीत माहिती देत रहावी, त्या माहितीचे संकलन करून आपल्या या क्षेत्रातील अनुभव पहाता पूस्तक हि प्रसिद्ध करणे सोपे जाईल व वाचकांना आपल्या संग्रही पूस्तक पिढ्यांन पिढ्या जतन करून ठेवता येईल! आपले सदैव मार्गदर्शन ब्लॉग वाचकांना मिळत रहावे, हिच देव वेतोबाच्या चरणी प्रार्थना!
ReplyDelete--अविनाश चमणकर
धन्यवाद
Deleteमाझ्या बालबुद्धिनुसार प्रयत्न सुरु आहेत. ही एक समाज सेवा आहे अशी माझी धारणा आहे. तुमच्या सारख्या आप्त व मित्रांचे आशिर्वाद नेहमी लाभोत ही ईश्वरचणी प्रार्थना.
ReplyDelete