Tried & tested: Fennel water

Summer season and I do not have a cordial relationship. Every time the temperatures starts rising, my body decides to turn into a human radiator. It is heavy, drained feeling that sets in when my body refuses to cool down. On peak summer days, even sitting under a fan feels like having a hair dryer blown straight into the face. I had tried several remedies but my body heat was resistant to everything.

Finally, I received a simple piece of advice: add a small pinch of fennel to drinking water, let it sit for about 15–20 minutes, and then drink it. I was sceptical, but they promised it would work wonders—and it truly delivered. After drinking the fennel water, I felt noticeably cooler and more relaxed, finally relieved of that intense, overheated feeling.

But the researcher in me could not just accept the results. I had to find out what the medical community had to say about this easy remedy. D Divya had extensively studied the benefits of fennel and had suggested to consume a fennel seed drink during the hot summer months to help the body cool down. A study by Noreen et al explained benefits of fennel. 

At the end of the day, fennel water is proof that effective relief doesn't have to be complicated or expensive. It is a simple, budget-friendly home remedy that can make those scorching summer days a lot more comfortable. Just remember that while natural tweaks like this are great for everyday cooling, they’re meant to support your routine—not replace professional medical advice if you're dealing with severe heat issues.

___________________________________________________________________________________

उन्हाळ्याचे आणि माझे काही फारसे सख्य नाही. जसा पारा वर चढू लागतो, तसे माझे शरीर एखाद्या 'Human radiator' सारखे (उष्णता उत्सर्जित करणाऱ्या यंत्रासारखे) वागू लागते. जेव्हा शरीर थंड होण्यास नकार देते, तेव्हा एक प्रकारचा जडपणा आणि थकवा जाणवू लागतो. उन्हाळ्याच्या कडक दिवसांत, पंख्याखाली बसल्यावरही असे वाटते की जणू कोणीतरी थेट माझ्यावर हेअर ड्रायर धरला आहे! मी अनेक उपाय करून पाहिले, पण माझ्या शरीरातील उष्णता कशानेही कमी होईना.

शेवटी, मला एक साधा सल्ला मिळाला: पिण्याच्या पाण्यात थोडी बडीशेप टाकावी, ते १५-२० मिनिटे तसेच राहू द्यावी आणि मग प्यावी. मला सुरुवातीला शंका होती, पण त्यांनी खात्री दिली होती की याचा खूप चांगला परिणाम होईल—आणि खरोखरच तसे घडले. बडीशेप घातलेले पाणी प्यायल्यानंतर, मला अधिक थंडावा आणि आराम जाणवू लागला; शरीरातील ती तीव्र उष्णतेची भावना अखेर दूर झाली.

परंतु माझ्यातील संशोधक वृत्तीला हे निष्कर्ष सहज मान्य झाले नाहीत. या सोप्या उपायाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे काय मत आहे, हे जाणून घेणे मला आवश्यक वाटले. D Divya यांनी बडीशेपेच्या फायद्यांचा सखोल अभ्यास केला होता आणि उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा मिळावा म्हणून त्यांनी बडीशेपेचे पाणी घेण्याचा सल्ला दिला होता. Noreen et al एका अभ्यासातही बडीशेपेच्या फायद्यांविषयी माहिती देण्यात आली होती.

थोडक्यात सांगायचे तर, बडीशेपेचे पाणी हे सिद्ध करते की प्रभावी आराम मिळवण्यासाठी कोणतीही क्लिष्ट किंवा महागड्या उपायांची गरज नसते. हा एक साधा, स्वस्त आणि मस्त घरगुती उपाय आहे, जो उन्हाळ्याच्या दिवसांत  आराम देऊ शकतो. मात्र, हे लक्षात ठेवा की, शरीराला थंडावा देण्यासाठी असे नैसर्गिक उपाय उत्तम असले, तरी ते केवळ तुमच्या दैनंदिन जीवनशैलीला पूरक आहेत. जर तुम्हाला उन्हामुळे गंभीर आरोग्य समस्या जाणवत असतील, तर अशा वेळी वैद्यकीय सल्ला घेणेच योग्य ठरेल.

Comments