Tried & tested: Alum

During my teenage years, I struggled with stubborn acne (Pimples). I did not intend to take oral medications. The topical treatments were not making any difference. I was constantly on the lookout for a safe and effective remedy. Seeing me struggle, one of my college professors recommended trying alum.


The remedy was easy: Wash the face. Run the alum under water. Apply the wet piece on alum on the face. Leave it for 10-15 minutes, then wash the face with water. 

The professor told me to do this ritual once every day for a few days. I decided to try it. Surprisingly the acne started to shrink and disappear. My skin became clear and smooth. 

Recently I decided to check if there is a scientific evidence to back this simple home remedy. A study by Singh et al highlighted that antibacterial and astringent properties of alum makes it an effective skincare solution for individuals prone to acne and oily skin. Another comprehensive review by Gajbhiye et al acknowledged the antimicrobial properties of alum and considered it to be an effective remedy for treating skin infections. These findings reaffirm my trust in using alum for skincare.

Speaking from experience, alum is a great natural aid for acne. Just remember: it should be used alongside professional treatment from a dermatologist, not in place of it.

_____________________________________________________________________________________

टीन एजमध्ये मला हट्टी मुरुमांच्या (पिंपल्सच्या) समस्येचा सामना करावा लागला. मला औषधे (oral medications) घ्यायची नव्हती. त्वचेवर लावायच्या औषधांचाही काहीच उपयोग होत नव्हता. त्यामुळे मी सतत एखाद्या सुरक्षित आणि प्रभावी उपायाच्या शोधात होते. माझा हा त्रास पाहून, माझ्या कॉलेजमधील एका प्राध्यापकांनी मला तुरटी वापरून पाहण्याचा सल्ला दिला.

उपाय सोपा होता: चेहरा धुवा. तुरटी पाण्याखाली धरा. तुरटीचा तो ओला तुकडा चेहऱ्यावर लावा. १०-१५ मिनिटे तसेच राहू द्या आणि त्यानंतर पाण्याने चेहरा धुवा.

प्राध्यापकांनी मला काही दिवस दररोज एकदा हा उपाय करून बघायला सांगितले. मी सुद्धा हा प्रयोग करून पाहण्याचे ठरवले. आश्चर्य म्हणजे, मुरुमे आकसून नाहीशी होऊ लागली. माझी त्वचा स्वच्छ आणि मुलायम झाली.

अलीकडेच मी या साध्या घरगुती उपायाला वैज्ञानिक आधार आहे का, हे तपासण्याचे ठरवले. Singh et al  नी केलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, तुरटीच्या जिवाणूनाशक आणि तुरट गुणधर्मांमुळे मुरुमे आणि तेलकट त्वचा असलेल्या व्यक्तींसाठी हा एक प्रभावी उपाय ठरतो. Gajbhiye et al नी केलेल्या आणखी एका विस्तृत अभ्यासात तुरटीच्या सूक्ष्मजीवनाशक गुणधर्मांना मान्यता देण्यात आली आणि त्वचेच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय मानला गेला. या निष्कर्षांमुळे त्वचेच्या काळजीसाठी तुरटी वापरण्यावरील माझा विश्वास अधिक दृढ झाला.

स्वतःच्या अनुभवावरून सांगायचे तर, मुरुमांसाठी तुरटी हा एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा: याचा वापर त्वचारोगतज्ज्ञांच्या (dermatologist) व्यावसायिक उपचारांसोबतच केला पाहिजे, त्याऐवजी नाही.

Comments