Tried & tested: Ice

 One day I was doom scrolling. I stumbled upon a creator hyping up facial icing - promising smooth,  radiant, spotless, acne-free skin. It sounded way too easy (and way too cheap) to pass up. 


I gave it a shot. I started rubbing ice cubes on my face for 30-40 seconds. Within few weeks, I saw a difference - my breakout faded, my face looked way less puffy, and my skin had this fresh, radiant glow. Even fine lines seemed smoother. Needless to say, I continued the application of ice on my face. Looking at these benefits, I decided to dive deeper into understanding, if research suggests anything similar.

Turns out cold therapy was one of the best kept secrets. A research by Palmer et al studied the effect of application of ice on faces of 41 individuals. At the time of completion of research, it was observed that application of ice led to significant improvement in wrinkles. Another systematic review by Rho NK concluded that cryotherapy (treatment that uses extreme cold) is a convenient and instant treatment for acne. Dermatologists have actually been using cold treatments all the way back since the 1940s—so the internet didn't just invent this!

From my personal test to actual dermatological research, the verdict is in: extreme cold is good for the skin. It is a cheap, effective way for glowing, healthy, and flawless skin of your dreams. Just remember: always use cryotherapy carefully to avoid cold burns. Also it is an awesome hack, not a replacement for medical care. If you've got prescribed skin treatments, keep those front and center!

___________________________________________________________________________________

एके दिवशी मी स्क्रोल करत असताना, मला एक क्रिएटर दिसला जो चेहऱ्यासाठीच्या आईसिंगचे खूप कौतुक करत होता - जो नितळ, तेजस्वी, डागविरहित आणि मुरुममुक्त त्वचेचे वचन देत होता. ते इतके सोपे (आणि इतके स्वस्त) वाटले की त्या संधीकडे दुर्लक्ष करणे शक्य नव्हते.


मी एकदा हे करून पाहण्याचे ठरवले. मी माझ्या चेहऱ्यावर ३०-४० सेकंद बर्फाचे खडे लावायला सुरुवात केली. काही आठवड्यांतच मला फरक दिसून आला - चेहऱ्यावरील मुरुमे कमी झाली, चेहऱ्यावरील सूज बऱ्याच अंशी ओसरली आणि त्वचेवर तेज आले. चेहऱ्यावरील बारीक रेषाही (fine lines) कमी झाल्यासारख्या वाटल्या. साहजिकच, मी चेहऱ्यावर बर्फ लावण्याचा हा उपाय सुरूच ठेवला. हे फायदे पाहून, याबद्दल काही संशोधन उपलब्ध आहे का, हे अधिक सविस्तरपणे जाणून घेण्याचे मी ठरवले.

अखेर असे दिसून आले की cold treatments हे एक उत्तम गुपित होते. Palmer et al यांनी केलेल्या एका संशोधनात ४१ व्यक्तींच्या चेहऱ्यावर बर्फ लावण्याच्या परिणामाचा अभ्यास केला. संशोधन पूर्ण झाल्यावर असे दिसून आले की, बर्फ लावल्याने सुरकुत्यांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली. Rho NK यांच्या आणखी एका पद्धतशीर अभ्यासात असा निष्कर्ष काढण्यात आला की क्रायोथेरपी (अतिशय थंडीचा वापर करून केलेला उपचार) हा मुरुमांवर एक सोयीस्कर आणि त्वरित उपचार आहे. त्वचारोगतज्ज्ञ तर १९४० च्या दशकापासूनच cold treatments वापरत आले आहेत—त्यामुळे इंटरनेटने काही याचा शोध लावलेला नाही!

माझ्या वैयक्तिक अनुभवापासून ते त्वचारोगविषयक संशोधनापर्यंत, एक गोष्ट स्पष्ट झाली आहे: अति-थंड तापमान त्वचेसाठी फायदेशीर असते. चमकदार, निरोगी आणि नितळ त्वचा मिळवण्याचा हा एक स्वस्त आणि प्रभावी मार्ग आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा:  'कोल्ड बर्न्स' (थंडीमुळे होणारी त्वचा इजा) टाळण्यासाठी 'क्रायोथेरपी'चा वापर नेहमी काळजीपूर्वक करा. ही एक उत्तम युक्ती (हॅक) आहे, वैद्यकीय उपचारांना पर्याय नाही. जर तुम्हाला त्वचेसाठी काही वैद्यकीय उपचार सुचवले असतील, तर त्यांनाच प्राधान्य द्या!

Comments