लहानपणी ऐकलेले एक गाणे होते 'गणपती आला आणि नाचून गेला'. ज्या घरांमध्ये दीड दिवसाचा उत्सव असतो त्यांना तर ही भावना आवर्जून जाणवत असेल. पण जिथे गणपती अनंत चतुर्दशीपर्यंत निवास करतात त्यांना तर गणेश विसर्जनाच्या नंतर नक्कीच अस्वस्थ वाटत असेल.
गेल्या काही वर्षांमध्ये गणेशोत्सव आधुनिक झाला आहे असे मला वाटते. हे आधुनिकीकरण काळाच्या गरजेच्या अनुषंगाने योग्यच वाटते. सण पारंपरिक, प्रथा सुद्धा पारंपरिक पण काही बदल काळाला अनुरूप. हे काही बदल मला सांगावसे वाटतात.
Internet ने कुटुंबाला दुरावाले अशी तक्रार करणारे बरेच जण असतात. पण ह्या आधुनिक माध्यमांच्या द्वारे Live Darshan तसेच Live आरती ह्या सुविधा उपलब्ध झाल्या.
विसर्जन जे पूर्वी फक्त नैसर्गिक स्रोतमध्ये होई ते आता कृत्रिम जालशयात होते. अनेक ठिकाणी विसर्जन हे घराच्या घरी tub मध्ये सुद्धा केले जाते.
आधी विसर्जनाच्या साठी लांबच लांब रांगा लागायच्या, पण आता ते पद्धतशीर होते. 2009 मध्ये मी night shift संपवून घरी येत असतानाही रात्रीच्या 12 वाजता मी अनंत चतुर्दशीच्या अनाकलानीय ट्रॅफिक मध्ये अडकले होते. रोजचा 45 मिनिटांचा प्रवास त्या रात्री 5 तासांचा झाला होता. पण बदल मला पुढच्या वर्षीच दिसून आला. मुंबई पोलिसांनी पद्धतशीर रित्या एक रांग विसर्जनाची आणि बाकी regular transport साठी ठेऊन जनसामान्यांची सोय केली. अनंत चतुर्दशीच्या दिवशीच्या पोलिसांच्या व्यवस्थेचे कौतुक करायला हवे.
आणखी एक बदल आहे तो जनसमुदायाच्या सोईचा. गणपती बघायला आलेली आणि विसर्जन करायला निघालेली मंडळीं तहान आणि भूकीमुळे व्याकुळ होऊ नये म्हणून काही मंडळानी मोफत पाणी आणि बिस्कीट द्यायला सुरुवात केले. त्याचे रूपांतर नंतर सरबत आणि वडापाव/सामोसा मध्ये झाले. ह्या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद बघून नंतर राजकीय पक्ष ह्यामध्ये उतरले. कालांतराने ही एक राजकीय चढाओढच झाली की कुठल्या पक्षाने किती गणेश भक्तांची सेवा केली. ह्यामधून चांगली गोष्ट म्हणजे निदान काही गरजू व्यक्तीची तहान भूक ह्या राजकारणी लोकांनी भगवली - हे ही नसे थोडके.
प्रत्येकाचा अनंत चतुर्दशीचा अनुभव वेगवेगळा असेल पण काही भावना समान असतील: विसर्जनानंतर घरात येणारी ती अथांग शांतता, बाप्पाच्या आसनाची रिक्त जागा पाहताना कंठ दाटून येणे आणि डोळ्यांतून ओघळणारे अश्रू – हे सगळे अनुभव प्रत्येकाच्या मनात एक कायमची ओल ठेवून जातात. बाप्पाने आपल्याला सोडून जाऊ नये असे वाटते. बाप्पा पुढल्या वर्षी लवकर यावा असे वाटते. नवीन वर्ष सुरू झाले की, सुट्ट्यांपेक्षाही "यंदा गणेशोत्सव कधी आहे?" हे शोधणारी आपली नजर ही बाप्पाप्रती असलेल्या अथांग प्रेमाची साक्ष देते.
ह्याच विचारांसह मी म्हणते "पुनरागमनाय च" 🙏🏻
🙏🏻🙏🏻
ReplyDelete