ॐ चक्षु:,चक्षु :,चक्षु :||
(हे नयनांच्या देवा सूर्यदेवा, तुला माझे वंदन)
तेज: स्थिरो भव ||
(तुझ्या तेजरूपाने तू माझ्या डोळ्यात सदैव राहा)
माम् पाहि पाहि ||
(तुझी कृपादृष्टी माझ्यावर सतत राहो)
त्वरितम् चक्षुरोगान् शमय शमय ||
(मला झालेले डोळ्यांचे रोग व त्यामुळे होणाऱ्या त्रासांचे शमन कर)
मम जातरूपं तेजो दर्शय दर्शय||
(माझ्या डोळ्यांची शक्ती क्षीण झाली आहे ती तू पूर्ववत कर)
यथा अहम् अंध :न स्याम् तथा कल्पय कल्पय ||
(तुझी कृपादृष्टी माझ्यावर अशी राहो जेणेकरून मला अंधत्व येणार नाही)
कल्याणम् कुरु कुरु||
(माझे सदैव हितच व्हावे ही तुझ्या चरणी प्रार्थना)
यानि मम् पूर्वजन्मो पार्जितनी चक्षु प्रतिरोधक दुष्कृतानि सर्वाणि निर्मूलन निर्मूलन ||
(विषारी नजरेमुळे माझ्या हातून ह्या जन्मी व पूर्वजन्मी जी दुष्कृत्ते घडली आहेत, त्याचा परिपाक म्हणून मला नेत्ररोग जडले आहेत, त्याचा नायनाट कर)
ॐ नमो चक्षुतेजोदात्रे दिव्याय भास्कराय ||
(डोळ्यांना तेजस्वी ठेवणाऱ्या हे दिव्य भास्करा तुला माझे वंदन)
ॐ नमो करुणाकराय अमृताय ||
(अमृताचा वर्षाव करणाऱ्या हे दयासागरा तुला माझे वंदन)
ॐ नमो सूर्याय अक्षीतेजसे नमः ||
(तेजस्वरूप अशा डोळ्यांच्या सूर्यदेवा तुला माझे वंदन)
खेचराय नमः, महते नमः ||
(खेचर व महत्देवा तुला माझे वंदन)
असतो मा सद्गमय ||
(असत्याकडून सत्याकडे जाणारी वाट मला दाखवा)
तमसो मा ज्योति:गमय् ||
(अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारी वाट मला दाखवा)
मृत्योर्मां अमृतं गमय ||
(मृत्यूपासून मोक्षाकडे जाणारी अमृतमय आणि अमरत्वाकडे जाणारी माझी वाटचाल कशी होईल याचे मला मार्गदर्शन करा)
उष्णो भगवान शुची : रूप:| हंसो भगवान शुची प्रतिरूप: ||
(हंसाप्रमाणे शुभ्र आणि तरल असे तुझे सुचिर्भूत रूप मला भावते )
य: इमाम् चाक्षु:मती विद्याम् नित्यम् अधीती, न तस्य अक्षीरोगो भवती ||
(हा चाक्षुशीविद्येचा मंत्र आहे, जो नित्य पठण करील त्याला कुठलाही नेत्ररोग होणार नाही)
न तस्य कुले अंध :भवती ||
(त्याच्या कुटुंबाला अंधत्वाची बाधा स्पर्श करणार नाही)
अष्टौ ब्राह्मणां ग्राह्ययित्व विद्या सिद्धिः भवती ||
(हा मंत्र ज्ञानाची उपासना करणाऱ्या आठ व्यक्तींना प्रदान करावा, जेणेकरून आपल्याला सूर्यतेजासह विद्या व सिद्धीची प्राप्ती होईल).
ॐ नमो भगवते आदित्याय।।

दत्तात्रय फणसे 🙏🙏
ReplyDeleteGood Information
ReplyDelete