Tried & tested: Betel leaf for cough

 In 2018, a stubborn dry cough refused to clear up. Despite following my doctor's prescription for antibiotics, antitussives, and bronchodilators, I found no relief. All tests showed nothing remarkable indicating that it was nothing but a seasonal cough. Following the failure of standard pharmacological interventions, I opted for traditional home remedies.

I crushed a betel leaf and mixed it with honey. I ingested the paste and avoided eating or drinking anything for next 30 minutes. I used this remedy twice in a day. Surprisingly, my deadly cough completely disappeared by the end of third day. 


Even though I already knew about this remedy, I wanted to see if science backed it up. A study by Nath and Debnath highlights betel leaf's ability to fight inflammation, ulcers, infections, and liver ailments. Another study by Saw, Thakare, and Uppalwar had proven that chemical compounds extracted from betel leaves had antibacterial and antifungal properties, making them useful for treating common infections. A dedicated study towards use of betel leaves in cough syrups by More, Udapurkar, and Madane confirmed that betel leaf is one of the most promising commercial botanical due to its antimicrobial properties.

While crushed betel leaves and honey can serve as an effective home remedy for a dry cough, traditional treatments should complement professional healthcare rather than replace it. Listening to your body and exploring natural solutions is valuable, but consulting a doctor ensures you address any underlying health concerns safely.

_____________________________________________________________________________________

२०१८ मध्ये, मला झालेला कोरडा खोकला काही केल्या बरा होत नव्हता. डॉक्टरांनी दिलेली अँटीबायोटिक्स, खोकला कमी करणारी औषधे (antitussives and bronchodilators) ह्यांचा मला काहीच फायदा झाला नाही. सर्व Tests चे निष्कर्ष सामान्य होते, ज्यावरून तो केवळ एक हंगामी खोकला असल्याचे दिसून आले. औषधोपचारांच्या या प्रमाणित पद्धतींचा काहीच उपयोग न झाल्यामुळे, मी पारंपरिक घरगुती उपाय वापरून बघायचे ठरविले.

मी एक विड्याचे पान कुस्करून त्यात मध मिसळले. ते मिश्रण मी खाल्ले आणि त्यानंतर ३० मिनिटे काहीही खाणे-पिणे टाळले. मी दिवसातून दोनदा हा उपाय केला. आश्चर्य म्हणजे, तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस माझा भयंकर खोकला पूर्णपणे बरा झाला.


मला या उपायाबद्दल आधीच माहिती असली, तरीही त्याला विज्ञानाचा आधार आहे का, हे मला जाणून घ्यायचे होते. Nath and Debnath यांच्या एका अभ्यासात विड्याच्या पानांची दाह (inflammation), अल्सर, संसर्ग आणि यकृताचे आजार यांच्याशी लढण्याची क्षमता अधोरेखित करण्यात आली आहे. Saw, Thakare, and Uppalwar यांच्या आणखी एका अभ्यासातून असे सिद्ध झाले होते की, विड्याच्या पानांपासून मिळवलेल्या रासायनिक घटकांमध्ये antibacterial आणि antifungal गुणधर्म असतात, ज्यामुळे ते सामान्य संसर्गावर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरतात. More, Udapurkar, and Madane यांनी खोकल्याच्या औषधांमध्ये (कफ सिरप) विड्याच्या पानांच्या वापराबाबत केलेल्या एका विशेष अभ्यासातून हे स्पष्ट झाले की, सूक्ष्मजीव-विरोधी गुणधर्मांमुळे विड्याचे पान हे एक अत्यंत आशादायक व्यावसायिक वनस्पतिजन्य उत्पादन आहे.

कोरड्या खोकल्यासाठी विड्याचे पान आणि मधाचे मिश्रण हा एक प्रभावी घरगुती उपाय ठरू शकतो, तरीही पारंपरिक उपचारांनी वैद्यकीय तज्ज्ञांच्या उपचारांना केवळ पूरक ठरावे, त्यांचा पर्याय म्हणून वापर करू नये. आपल्या शरीराच्या गरजा समजून घेणे आणि नैसर्गिक उपाय शोधणे नक्कीच मोलाचे आहे; मात्र डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास आरोग्याशी संबंधित कोणत्याही मूळ समस्यांवर सुरक्षितपणे औषधोपचार करणे शक्य होते.

Comments

  1. Excellent and very useful. Many a times we ignore the home remedies and follow the other path. Back to Basics.

    ReplyDelete
  2. आजीबाईचा बटवा.

    ReplyDelete

Post a Comment