आज आपण मनोरंजनाचे साधन व धर्म यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी मी पत्त्याचा कॅट हे साधन वापरणार आहे.
कॅट मध्ये ५२ पत्ते असतात व एक किंवा दोन जोकर असतात. म्हणजेच कमाल पत्ते ५४, रंग दोन - 'लाल व काळा' व प्रकार ४ - 'इस्पिक, बदाम, किलवर, चौकट'.
दोन रंग म्हणजे 'दिवस आणि रात्र'. चार प्रकार म्हणजे चार आश्रम - ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, व संन्याशाश्रम. अथवा चार उपाय - साम, दाम, दंड, भेद अथवा चार वेद - ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, व अथर्ववेद.
एका चांद्रवर्षात ५२ आठवडे येतात हे ५२ आठवडे म्हणजे आपले ५२ पत्ते. प्रत्येक प्रकारात १३ पत्ते म्हणजे ४×१३ = ५२ आठवडे झाले.
या ५२ पत्त्यांची म्हणजेच एक्का ते राजा यांची बेरीज ३६४ होते त्यात जोकर धरला की झाले ३६५ म्हणजे एक चांद्रवर्ष. दुसरा जोकर समाविष्ट केला तर बेरीज होते ३६६ म्हणजेच 'लीप वर्ष'.
५२ पत्त्यात बारा चित्रपत्ते असतात.. गुलाम, राणी, राजा म्हणजेच ४×३ = १२ यांना आपण बारा महिने संबोधूया.
आता पत्त्यांचा अर्थ लावूया
- दुर्री - दोन ग्रहणे - सूर्यग्रहण व चंद्रग्रहण
- तिर्री - तीन गुण - सत्व, रज, तम... त्रिदेव - ब्रम्हा, विष्णू, महेश
- चौकी - चार वाणी - परा, पश्यती, मध्यमा, वैखरी
- पंजी - पाच पांडव - धर्म, भीम, अर्जुन, नकुल व सहदेव किंवा पंचेंद्रिय - नाक, कान, डोळे, जीभ व त्वचा.
- छक्की - षडरिपू - काम, क्रोध, मद, मोह, मत्सर व लोभ
- सत्ती - सप्त स्वर - सा, रे, ग, म, प, ध, नि
- अठ्ठी - अष्टदिशा - पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य
- नव्वी - नवग्रह - रवि, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू व केतू.
- दश्शी - दशावतार - मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बुद्ध व कल्की
- गुलाम - मनातील वासना
- राणी - माया
- राजा - सर्वांचा शासक
- एक्का - मानवाचा विवेक
पत्ते खेळताना भिडू असतोच - तेच आपले प्रारब्ध
पत्त्यांची सांगड आपण अशा प्रकारे लावू शकतो, अशी माझी धारणा आहे.
हा लावलेला संदर्भ कसा वाटला जरूर लिहा.
ब्लॉगच्या खाली कमेंट्स मध्ये आपल्या नावासकट अभिप्राय लिहा जेणेकरून संपर्क साधने सुलभ होईल.
पुढील आठवड्यात रविवारी सकाळी भेटूच.


मस्त
ReplyDeleteThank you
DeleteKhupach sundar … pratyek sambandh agadi chapkhal lagtoy…
ReplyDeleteThank you
Deleteछान सांगड घालून विषय सोपा केला आहेस
ReplyDeleteThank you
Delete५२ पत्ते आणि २ जोकर यांचा आपल्या जीवनाशी असलेला संदर्भ किती सहज ,सोप्या रितीने सांगितला आहे.खरच फार छान माहिती. कधी असा विचारच केला नव्हता.
ReplyDeleteअलका व विश्वास
Thank you
DeleteMassta analogy!!!
ReplyDeleteThank you
Delete