नमस्कार मंडळी.
माझ्या "श्रीगणेश पूजा विधि" या गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या पुस्तकाला गणेश भक्तांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. यामुळे मला मिळालेली उमेद असे सांगत होती की आपल्या हिंदू धर्मात अशा अनेक प्रथा आहेत आणि अशी माहिती आहे जी आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. ती जतन करणे आवश्यक आहे जसे की आजीबाईचा बटवा इत्यादी. याच्या अनुषंगाने मी विविध विषयांना आजपासून स्पर्श करण्याचा आणि ते विषय आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. अपेक्षा ही आहे की माझा हा संकल्प आपल्या पसंतीस उतरेल.
कुठल्याही कामाची सुरुवात करताना गणेशाला वंदन करूनच आपण करतो.
ॐ गं गणपतये नमः |
अष्टविनायकांची नावे याप्रमाणे:
मोरगावचा मयुरेश्वर
सिद्धटेकीचा सिद्धिविनायक
पालीचा बल्लाळेश्वर
मढचा वरदविनायक
थेऊरचा चिंतामणी
लेण्याद्रीचा गिरिजात्मक
ओझरचा विघ्नेश्वर
आणि आठवा रांजणगावचा महागणपती

वाचकहो, ही सुरुवात आहे. दर आठवड्यातून एकदा मी आपल्या भेटीस येईन. प्रत्येक वेळी विषय वेगळा असेल, अशी माझी अशी माझी संकल्पना आहे.
- आनंद कृष्णाजी कणेकर
Very good start. All the best.
ReplyDeleteThank you.
DeleteKhup Sundar...
ReplyDeleteThank you
DeleteGreat Anand Kaka. All the best.
ReplyDeleteThank you
Delete